लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले, राज्याची आर्थिक..

Ajit Pawar on Ladki Bahin Scheme : राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेत (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांच्या बँंक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. पण निवडणुकीच्या काळात दिलेलं 2100 रुपयांचं आश्वासन कधी पूर्ण करणार असा सवाल विरोधक विचारत आहेत. निवडणुकीच्या काळात असे कोणतेच आश्वासन मुख्यमंत्री किंवा अन्य नेत्यांनी दिलेले नव्हते असे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले होते. त्यानंतर आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडक्या बहिणींना धक्का देणारे वक्तव्य केले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर वाढीव मदत दिली जाईल असे अजित पवार म्हणाले आहेत.
अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली. विधानसभेत गुरुवारी 2025-26 च्या अर्थसंकल्पातील वित्त, नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. याआधी चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान कधी मिळणार याबाबत माहिती दिली.
लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती… अजित पवारांनी सभागृहात कोणती मोठी घोषणा केली?
सध्या राज्यातील लाभार्थ्यांनी कबूल केल्याप्रमाणे मदत दिली जात आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की वाढीव मदतही देऊ असे अजित पवार म्हणाले. राज्य सरकारच्या उत्पन्न वाढीच्या मार्गांवर चर्चा सुरू असताना यात भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काही सूचना केल्या. राज्य सरकारने लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढीचा विचार करावा. यासाठी त्यांनी केरळ आणि अन्य राज्यांना लॉटरीतून मिळणाऱ्या उत्पन्नांबाबत सभागृहात माहिती दिली.
यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना सर्व प्रकारच्या लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय आमदारांची समिती नियु्क्त करण्याची घोषणा केली. या समितीने महिनाभरात अभ्यास करून अहवाल सादर करावा असे अजित पवार म्हणाले. राज्याचे स्थूल उत्पन्न सध्या 49 लाख 39 हजार कोटी रुपये आहे. महसुली तूट एक टक्क्याच्या आत आहे. महसूल जमा करून राज्याला आर्थिक शिस्त लावायची आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
एमपीएससीच्या रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा, अजित पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र