राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूल विजेता; चार खेळाडूंची महाराष्ट्राच्या हॉकी संघात निवड
राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघ या स्पर्धेचा विजेता; चार खेळाडूंची महाराष्ट्राच्या हॉकी संघात निवड.
Gautam Public School wins state-level school hockey tournament : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 6 ते 7 रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी (Hockey) मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी (State Hockey Tournament) स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघ या स्पर्धेचा विजेता संघ ठरला असून गौतम पब्लिक स्कूलच्या प्रणव लोंढे (गोलकीपर), श्रेयस गाडेकर, कृष्णा सातपुते व रणवीरसिंग नागलोट चार खेळाडूंची महाराष्ट्राच्या (Maharashtra) हॉकी संघात निवड झाली आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होवून त्यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक देवून गौरविण्यात आले.
या प्रसंगी बोलताना चैताली काळे यांनी उपस्थित सर्व खेळाडू व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी त्यांनी प्राचार्य नूर शेख यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आयोजक कमिटीतील शाळेचा क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे कौतुक करून लवकरच गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यासाठी आवश्यक सोयी सुविधांनी सज्ज मैदान उभारले जाईल असे आश्वासन दिले. मैदानी खेळाद्वारे आपला शारीरिक व मानसिक विकास साधावा असे आवाहन केले.
मालवण नगर परिषदेत एकमेकांना भिडले; आता निलेश राणे म्हणतात रवींद्र चव्हाण माझे मोठे भाऊ
यावेळी प्रशिक्षक वैभव दुधाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना शाळेचे प्राचार्य नूर शेख यांचे हॉकी क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात येवून दोन दिवस स्पर्धा सुरु असतांना क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खूरंगे, निवड समिती सदस्य उदय पवार, उमेश बडवे, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, तालुका क्रीडा अधिकारी सागर कारंडे, तालुका क्रीडा अधिकारी वैशाली सुळ, तालुका क्रीडा अधिकारी प्रवीण कोडावळे, माजी क्रीडा अधिकारी महेश कुटाळे आदी अधिकारी स्वतः हजर होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर व अमरावती अशा आठ विभागातील मुला-मुलींचे एकूण 16 संघ सहभागी झाले. उपांत्य फेरीतील सामना गौतम पब्लिक स्कूल (पुणे विभाग) व मुंबई विभाग (डॉन बॉस्को स्कूल) या दोन्ही संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने शेवटपर्यंत सामन्यावर वर्चस्व ठेवून हा सामना 3-0 असा एकतर्फी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचा अंतिम सामना पुणे विभाग (गौतम पब्लिक स्कूल, अहिल्यानगर);व कोल्हापूर विभाग (डी.सी.नरके विद्यालय, कुडीत्रे) यांच्या दरम्यान झाला.
इंडिगोची मोठी अपडेट! 138 पैकी 137 ठिकाणी उड्डाणे सुरू; वाचा, सविस्तर
हा सामना अतिशय रोमहर्षक व अटीतटीचा झाला. दोन्ही संघाचे समसमान तीन गोल झाले असतांना शेवटपर्यंत कोणता संघ विजयश्री प्राप्त करील याची शाश्वती नव्हती. अशा वेळी पुणे विभागाने (गौतम पब्लिक स्कूल, अहिल्यानगर)च्या संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत कोल्हापूर विभागाचा पेनल्टी स्ट्रोक मध्ये अतिशय सफाईदारपणे चौथा गोल करून 4-3 अशा गोल फरकाने पराभव करून राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेच्या विजेत्यापदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेचे दरम्यान गौतम पब्लिक स्कूल परिसर मनमोहक विद्युत रोषणाईने प्रकाशमान करण्यात आला होता. दोन दिवस मुक्कामी असलेले सर्व खेळाडू व प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, ट्रायल साठी आलेले सर्व खेळाडू पालक यांची राहण्याची जेवणाची उत्कृष्ट सोय करण्यात येवून संध्याकाळी सर्वांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. स्पर्धेत सहभागी बहुतांश संघातील उत्कृष्ट खेळाडूंची महाराष्ट्राच्या हॉकी संघात निवड करण्यात आली. निवड समितीने निवडलेला महाराष्ट्र हॉकी संघ (वयोगट 14 वर्ष मुले) पुढीलप्रमाणे असून यामध्ये प्रणव सतीश लोंढे (गोलकीपर, अहिल्यानगर), प्रसाद प्रशांत पाटील (गोलकीपर, नाशिक), आलोक अरविंद जाधव (सांगली), श्रेयस शंकर मलाई (कोल्हापूर), श्रेयस दीपक गाडेकर (अहिल्यानगर), अर्णव संदीप भांड (नाशिक), कृष्णा गणेश सातपुते (अहिल्यानगर), प्रवीण हिंदुराव पाटील (कोल्हापूर), क्लाईड मेंडोंसा (मुंबई), जगजीत सेवा सिंग (नांदेड), अनुप नयन पाटील (कोल्हापूर), रायजिंग रिचर्ड डेव्हिड (मुंबई), मयूर विष्णू मडावी (अमरावती), ऋत्विक वैभव चव्हाण (संभाजीनगर), रणवीरसिंग चरणसिंग नागलोट (अहिल्यानगर), पियुष भुमेश्वर मडावी (नागपूर), स्लाईड जॉन्सन अँड्र्यूज (पूणे), राजवीर रणजीत पाटील (कोल्हापूर).
Putin India Visit : मोदींनी प्रोटोकॉल मोडताच खूश होत पुतीन यांनी बदलला शेकहॅन्ड; खास मेसेज काय?
तसेच मुलींचा महाराष्ट्र हॉकी संघ (वयोगट 14वर्ष) पुढीलप्रमाणे यामध्ये आराध्या तुषार चोरमले (गोलकीपर, सातारा), संस्कृती पंकज शेटे (गोलकीपर, अहिल्यानगर), श्रावणी सतीश जाधव (सातारा), आर्या अजित महागडे (सातारा), क्रितिका सदबीरा सिंग (मुंबई), दूर्वा रामचंद्र साळुंखे (सातारा), उन्नती रवींद्र गुबे (नागपूर), जानवी बाजीराव वाघमोडे (अहिल्यानगर), विनिता गिरीश वसावे (नाशिक), खुशी सुखलाल पावरा (नाशिक), अलिझा फिरोज पठाण (पुणे), अनघा भरत केंजळे (सातारा), सांची संदेश सरोडकर (संभाजीनगर), वृषाली आदिनाथ रेवांना (सांगली), चैतन्या आनंद कलसे (लातूर), अक्षया निलेश भारसाकळे (अमरावती), निहारिका विजय लोखंडे (कोल्हापूर), श्रद्धा पांडुरंग लबडे (अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.मुलांच्या शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धा दिनांक 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मध्यप्रदेशातील टीकमगढ येथे तर मुलींच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धा जानेवारी महिन्यात मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे होणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, सचिव चैताली काळे, सर्व संचालक, संस्था निरीक्षक नारायण बारे व प्राचार्य नूर शेख आदींनी गौतम पब्लिक स्कूलच्या विजेत्या हॉकी संघाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
