‘घुंगरु’ चित्रपटात ‘गौतमी’ची भूमिका काय? Gautami Patil ने सांगून टाकलं
Gautami Patil Speak On Ghungru Movie : आपल्या दिलफेक अंदाजाने नृत्यांगणा गौतमी पाटीलने (Gautami Patil) राज्यभरात एक मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी प्रतिसाद दिल्याने आता गौतमी पाटीलने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. कलाकारांच्या जीवनावर आधारित गौतमीचा पहिलाचं ‘घुंगरु’ (Ghungru Movie) हा चित्रपट येत्या 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल माहिती देताना ‘घुंगरु’ चित्रपटात गौतमी पाटील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटामध्ये तिचं ‘अंतरा’ नाव असल्याचं गौतमी पाटीलने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
आरक्षणाच्या तापलेल्या वातावरणात शिंदे सरकारनं खेळलं ओबीसी कार्ड; तब्बल 3377 कोटींची तरतूद
गौतमी पाटील पुढे बोलताना म्हणाली, घुंगरु चित्रपट येत्या 15 डिसेंबरला येत आहे. हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मला जास्त अॅक्टिंग जमत नाही डान्स जमतो, पहिल्यांदाच अशा प्रकार चित्रपटात जसं जमलं तसं सादरीकरण केलं आहे. प्रेक्षकांना माझी अॅक्टींग आवडेल की नाही? हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल, त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा, असं आवाहन गौतमीने केलं आहे.
Photos : मोहन यादवांच्या शपथविधीला शिंदे-फडणवीस अन् पवार भोपाळला; पाहा फोटो
तसेच चित्रपटात माझी मुख्य भूमिका असून त्यामध्ये माझं नाव अंतरा असणार आहे. कलाकारांचं आयुष्य कसं असतं? पुढ काय होतं? त्यांचं जीवन भविष्य काय असतं? हे या चित्रपटात दाखवलं आहे. यासोबतच 15 डिसेंबरला ‘घोटाळा’ गाणं प्रदर्शित होणार असल्याचंही गौतमी सांगितलं आहे.
Sharad Pawar’s Birthday Special: शरद पवारांचे राजकारण आणि कौटुंबिक संबंध याचा आढावा |LetsUpp Marathi
आज मी कमवत आहे, पण बाकी इतर कलाकारांचं काय? कोरोना काळात बिकट परिस्थिती होती. माझं जे काही झालं ते लॉकडाऊननंतरच झालं. काम नसेल तर उदनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे घरं कसं चालवायचं हा अनेकांना प्रश्न असतो, हा चित्रपट माझ्यामुळे नाहीतर चित्रपटाच्या कथेमुळे चालणार असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, 15 डिसेंबर पासून राज्यातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असलेल्या ‘घुंगरु’ चित्रपटात गौतमी पाटीलच्या आयुष्याचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. राज्यात तब्बल 100 स्क्रीनवर गौतमी पाटीलचा जीवन संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 10 डिसेंबरपासून गौतमी पाटील स्वतः या चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे. चित्रपटात लावणी, प्रेम गीत आणि आयटम गीत अशी गाणी असणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना हा चित्रपट कसा असणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.