Girish Mahajan : हातावर दांडा आणि काळा झेंडा घेऊन फिरा; महाजनांनी खडसेंना सुनावले !

Girish Mahajan : हातावर दांडा आणि काळा झेंडा घेऊन फिरा; महाजनांनी खडसेंना सुनावले !

Girish Mahajan : आपले लाडके माजी एकनाथ खडसे काळे झेंडे दाखवत होते. मला त्यांच्याकडे बघून हसू येत होत. काय बोलाव काही समजतच नव्हतं. काय वेळ आली या माणसावर कुठे उभे राहिले राष्ट्रवादी कार्यालयाच्या ओट्यावर खोलीत तिकडून असे असे करताय म्हटलं समोर या या ना रस्त्यावर. काय वेळ आली तुमच्यावर? भाजपचे नेते आणि मंत्री गिरिश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर केली. ते जळगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती. (Girish Mahajan criticize Eknath Khadase on NCP and bhosari land crises )

काय म्हणाले गिरिश महाजन?

महाजन म्हणाले की, आपले लाडके माजी एकनाथ खडसे काळे झेंडे दाखवत होते. मला त्यांच्याकडे बघून हसू येत होत. काय बोलाव काही समजतच नव्हतं. काय वेळ आली या माणसावर कुठे उभे राहिले राष्ट्रवादी कार्यालयाच्या ओट्यावर खोलीत तिकडून असे असे करताय म्हटलं समोर या या ना रस्त्यावर. काय वेळ आली तुमच्यावर? का पक्ष सोडण्याती वेळ आली? कशासाठी गेलात आज आम्हाला काळे झेंडे दाखवता. भोसरीच्या त्या पुण्याच्या त्या जमिनीवर तोंड काळं केलं नसतं तर तुमच्यावर असे काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती तुमच्यावर.

काय काय पराक्रम आपण केलेत. 30-35 वर्ष तुम्ही पक्षात विविध पदं भोगलीत आणि माझ्यावर अन्याय झाला म्हणून छाती पिटवत आहात. पण तुम्ही कामचं तशी केलीत म्हणून तुमच्यावर असी वेळ आली. आता आपल्या नेत्यालवा काही तरी दाखवायचय की, बघा मी काही तरी करतोय. जिल्ह्यामध्ये माझ काही तरी आहे. पण राहिलं काय? बॅंक गेली, दुध संघ गेला. स्वतःची कोथळीची ग्रामपंचायत गेली. आमदारकी गेली. आता राहिलं काहीच नाही. आता हातावर दांडा आणि काळा झेंडा आहे. फिरा घेऊन आम्ही आलो की. म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली आणि एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला ते काळे झेंडे दाखवत आहेत. मात्र या ठिकाणी विविध योजना आणि विकास कामांमधून मला जेजे काळे झेंडे दाखवत आहेत. वाकड्यातोंडाने बोलत आहेत. त्यांना हे उत्तर आहे. आपल्या मतदारसंघात आपण काय केलं ते सांगा. आपण साधा बोदवड सिद्ध प्रकल्प पूर्ण केला नाही.

त्याचबरोबर यावेळी महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. परवा उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. ते म्हणाले पंतप्रधान अमेरिकेत जाऊन बसले. मात्र ते काही तुमच्यासारखे फिरायाला गेले नाहीत. फोटोग्राफी करायला गेले नाहीत. पण ते पत्येक भारतीयांना अभिमान वाटावा की, त्यांचा अमेरिकेत बहुमान होतो. मात्र आमचे नतद्रष्ट माजी मुख्यमंत्री विचारतात कशासाठी गेले. करायच काहीच नाही. फक्त डिंग्या मारायच्या, पंतप्रधानांवर टीका करण्याची तुमची पात्रता तरी आहे का? हे जरा तपासून पाहा मग टीका टीपण्णी करा. अशी टीका भाजपचे नेते आणि मंत्री गिरिश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube