मोठी बातमी! MPSC आता वर्ग दोन आणि तीनचे पदे भरणार

मोठी बातमी! MPSC आता वर्ग दोन आणि तीनचे पदे भरणार

MPSC Exam : सर्वच शासकीय कार्यालयातील लिपिक संवर्गातील पदे MPSC मार्फत भरण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार आता राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट – ब व गट – क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने MPSC मार्फत भरण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेण्यात आला आहे.

आता राज्य शासनातील गट-अ गट-ब (राजपत्रित तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहे. ही पदे 04 मे, 2022 च्या शासन निर्णयातील कार्यपध्दतीनुसार विविध निवड समित्यांमार्फत भरण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2020 मध्ये काही अटींच्या अधिन गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास मान्यता दिली होती. त्याअनुषंगाने दिनांक 02 नोव्हेंबर, 2022 च्या शासन निर्णयान्वये गट-क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने टि.सी.एस. (TCS) आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टिटयूट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांमार्फत घेण्याबाबतचा निर्णय दिनांक 21  नोव्हेंबर, 2022 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता. तसेच कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीचे शुल्क संदर्भाधीनच्या दिनांक 14 फेब्रुवारी, 2023 च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे.

मनोरमा खेडकरांच्या अडचणीत होणार वाढ? ‘त्या’ प्रकरणात होणार सखोल चौकशी

या निर्णयासाठी राज्य सरकारने अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग (अध्यक्ष), अपर मुख्य सचिव (वित्त विभाग), सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सह सचिव/उप सचिव (मलोआ/सामान्य प्रशासन विभाग) ,सह सचिव/उप सचिव (कार्यासन सेवा-4/सामान्य प्रशासन विभाग) यांचा समावेश आहे.

परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असावी आणि सर्व परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात या मागणीसाठी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता.

राज्यशासनाने एक शासन निर्णय प्रसिद्ध करत गट अ ब क राजपत्रित ही सर्व पद एमपीएससी द्वारे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थी प्रतिनिधी महेश बडे यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

एमपीएससीला सक्षम करणे हे महत्त्वाचे होते. त्यासाठी चार अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भविष्यात विद्यार्थांना पेपरफुटी सारख्या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अशी अपेक्षा विद्यार्थी प्रतिनिधी महेश बडे यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube