अर्ध्या मंत्रीमंडळाला झोप येणार नाही, फडणवीसांच्या नादी लागू नका, जरांगेंचा राणेंना इशारा

अर्ध्या मंत्रीमंडळाला झोप येणार नाही, फडणवीसांच्या नादी लागू नका, जरांगेंचा राणेंना इशारा

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पुण्यात (Pune) आयोजित मराठा आरक्षण शांतता रॅलीमध्ये बोलताना आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास (MVA) आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

या रॅलीत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांनो तुम्ही आज केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश हादरवला आहे. आज सर्वांना कळलं आहे मराठा काय करू शकतात, विधानसभा कुणाकुणाचे टांगे पालटे होऊ शकतात ते आतापासूनच कामाला लागले आहे असं यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

तर यावेळी राणेंना उत्तर देत जरांगे पाटील म्हणाले की, आता कोकणातील नेते देखील जातीविरोधात बोलत आहे. आम्ही त्यांना सम्मान शब्द दिला सम्मान. माझी त्यांना विनंती आहे, आम्ही तुम्हाला मानतोय, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नादी लागून मराठांच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही आजही तुम्हाला मानतोय आणि आयुष्यभर मनात राहू सम्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. विनाकारण मराठांच्या अंगावर येणारा माणूस संपल आहे तुम्ही संपू नका, देवेंद्र फडणवीस तुमची जागिरी नाही. हा समाज तुमचा मालक आहे. समाज तुम्हाला मोठे करणार आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी नितेश राणेंना (Nitesh Rane) इशारा दिला.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, माझं स्वप्न मराठ्यांना मोठं करायचं आहे. तुम्ही सोबत आहे म्हणून मी उभा आहे आणि तुम्ही सोबत आहे म्हणून आज अर्ध मंत्री मंडळाला झोप येणार नाही. यांनी मला बदनाम करण्याचा आणि एकट पडण्याचा प्रयत्न केला. मात्र माझी फक्त दोन स्वप्न आहेत, माझा समाज आणि त्यांची लेकरं मोठी करायची आहेत. मात्र विरोधकांना दुःख आहे, मी फुटत नाही. त्यांनी मागच्या दारावाटे काहींना पाठवलं असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर निशाणा साधला.

तसेच मी बोलायला लागल्यास दोन- दोन लिटर पाणी पितात, मी मान- सन्मान करतो आहे, त्यांना आणखी एक संधी देतो, त्यांनी बोलू नये, अन्यथा त्यांना प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी राणेंना दिला. माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर हे देखील आपले कार्यकर्ते झाले आहेत, त्यांनी तिथली दुसरी गोळी देऊ नये, ते देखील आता एक मराठा लाख मराठा म्हणतायत.

मेलो तर चालेल मला जात महत्वाची आहे, समाज महत्वाचा आहे. या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, शेवटपर्यंत जगायचं तर वाघ म्हणूनच. आज पहाटे बातम्या येतील मंत्री मंडळी धुसपुस सुरू झाली. पुण्यातील ही ताकद बघून जे आपल्या विरोधात बोलले ते आता पडलो असेच समजा. ज्या मंत्र्याला- नेत्याला तुम्ही मोठं केलं तो त्याच्या पक्ष्याला बाप म्हणत आहे. अशा व्यक्तींना मोठं करू नका, समाज हित पाहणारे आता नेते पाहिजेत. असा आवाहन देखील यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केला.

29 ऑगस्टला मोठा निर्णय

यावेळी बोलताना जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आज राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमधले नेते आरक्षणा विरोधात बोलत आहे. छगन भुजबळ एकटा आहे पण ते आरक्षणाला विरोध करत आहेत. अंतरवाली येथे 29 ऑगस्टला एक बैठक ठरवली आहे. या दिवशी पाडायचे की उभे करायचे यावर निर्णय होणार असेही जरांगे म्हणाले.

Chhagan Bhujbal : ‘आठ आमदार निवडून आणून दाखव’, भुजबळांचं थेट जरांगेंना चॅलेंज

तर आगामी विधानसभा निवडणुकीत बरेच जण पडणार आहे. ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला आहे. त्यांना निवडून येऊ देणार नाही. तुम्ही आता गाफील राहू नका. मी मरे पर्यंत इमानदारी विकत नाही. आपल्यातून अनेक जण फुटले आहे मात्र आम्ही फुटणार नाही. असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube