मोठी बातमी! राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष- चिन्हाची सुनावणी लांबणीवर

NCP and Shiv Sena Symbols Hearing : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार होती मात्र

  • Written By: Published:
NCP And Shiv Sena Symbols Hearing

NCP and Shiv Sena Symbols Hearing : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार होती मात्र आता ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. आज होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर आता या प्रकरणात शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे. पक्ष आणि चिन्हाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार आहे.

या प्रकरणात आज 21 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता सुनावणी सुरु होणार होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकली असून या प्रकरणात शुक्रवारी 11.30 ला पुढील सुनावणी होणार आहे. आज होणाऱ्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोन्ही पक्षांना युक्तीवाद करण्यासाठी प्रत्येकी तीन- तीन तासांचा कालावधी दिला होता. तसेच जर आज सुनावणी पूर्ण झाली नाही तर या प्रकरणात 22 जानेवारी रोजी देखील सुनावणी होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली होती. यासाठी 22 जानेवारीला कोणतेही महत्त्वाचे प्रकरण सूचिबद्ध करु नये असे निर्देश सरन्यायाधीश सूर्य कांत (Chief Justice Surya Kant) यांनी मागच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांना दिले होते.

तर दुसरीकडे या प्रकरणावर अ‍ॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी भाष्य करत राष्ट्रवादीचा वाद ते आपसात सोडविण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या आपसातील वागणुकीवरून आणि घडामोडींवरून दिसते तरीही शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुप्रीम कोर्टातील याचिका परत काढून घेईपर्यंत त्यांचे राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे प्रकरण बोर्डवर येत राहिलच असं म्हटलं आहे.

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नेमकं काय म्हणाले होते असीम सरोदे?

सर्वोच्च न्यायालायने आज 11.30 वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरु केली तरच निदान सुरुवात होऊन उद्या सुनावणी पुढे राहण्याची शक्यता आहे. (जरी आता राष्ट्रवादीचा वाद ते आपसात सोडविण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या आपसातील वागणुकीवरून आणि घडामोडींवरून दिसते तरीही शरद पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टातील याचिका परत काढून घेईपर्यंत त्यांचे राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे प्रकरण बोर्डवर येत राहिलच). परंतु आज दुपारी एक वाजेपर्यंतच चीफ जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील कारण दुपारी एक वाजतापासून चीफ जस्टीस आणि न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करतील.

अरावली डोंगर रांगा बाबत च्या केसची सुनावणी घेण्यात येईल त्यामुळे शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही.

follow us