महाराष्ट्रात उष्णतेची लाट; काही ठिकाणी पारा ४२ अंशापर्यंत, ‘या’ जिल्ह्यात पावसाचीही शक्यता

महाराष्ट्रात उष्णतेची लाट; काही ठिकाणी पारा ४२ अंशापर्यंत, ‘या’ जिल्ह्यात पावसाचीही शक्यता

IMD Predicts Rain in Some Areas Of Maharashtra : राज्यात गेल्या दिवसांपासून तापमान वाढ होताना दिसून येतो आहे. काही ठिकाणी पारा ४२ अंशापर्यंत पोहोचला आहे. विदर्भात पुढचे दोन दिवस उन्हाचा तडाखा (Rain) जाणवणार असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यातील काही भागात पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

Weather Update : राज्यात पारा वाढला, पुढील तीन दिवस या भागांमध्ये उष्णता वाढणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय अकोला आणि वर्धा येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तसेच ब्रह्मपुरी, अमरावती, सोलापूर, नागपूर, मालेगाव, गडचिरोली येथे तापमान चाळीशीपार पोहोचलं आहे.

महत्त्वाचे म्हणजे आज विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तापमानातील तापमानात वाढ कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. बुधवारपासून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

२४ तासांमध्ये राज्यात नोंदवले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे- ३८.७

धुळे-३९.५

जळगाव-३८.५

कोल्हापूर- ३७.१

महाबळेश्वर-३२.५

मालेगाव -४०.०

नाशिक-३६.९

निफाड-३७.५

सांगली- ३७.९

सातारा- ३७.७

सोलापूर- ४०.३

सांताक्रूझ- ३५.१

डहाणू- ३३.३

रत्नागिरी- ३२.९

छत्रपती संभाजीनगर-३८.४

उन्हाचा चटका कायम राहणार

धाराशिव- ३८.०

परभणी- ३९.०

परभणी (कृषी)- ३८.०

अकोला- ४१.३

अमरावती- ४०.४

भंडारा- ३९.४

बुलडाणा- ३७.६

ब्रह्मपुरी- ४०.८

चंद्रपूर- ४२.०

गडचिरोली- ४०.०

गोंदिया- ३८.८

नागपूर- ४०.२

वर्धा- ४१.०

वाशीम- ३९.८

यवतमाळ- ३९.८

follow us
  • fb
  • instagram
  • youtube