मोदींच्या गुजरातमधील हिंदू तरुणांने राज ठाकरेंकडे मागितली मदत

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 03 27 At 1.53.31 PM

अहमदाबाद : गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यसरकारला अरबी समुद्रामधील माहीम दर्गा पाडण्याचे अल्टिमेटम दिले होते. त्यानंतर काहीच तासात राज्यसरकारने ही दर्गा जमीनदोस्त केली. आता यामुळे मोदींच्या गुजरातमधील अहमदाबादच्या एका हिंदू तरुणाने ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली आहे. या तरुणाचे नाव लिंकन सोखडीया असे आहे.

त्या तरुणाने ट्विट करत म्हटले आहे हाच ‘अहमदाबाद’चा चांडोळा तलाव, जो आता नामशेष झाला आहे.

इथला निम्मा तलाव बेकायदेशीरपणे बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी पचवला आहे आणि हे संपूर्ण गुजरातला माहीत आहे.

येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात आणि अनेक गुन्हेगार लपून बसले आहेत. आणि इथे एक नाही तर अनेक मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत.

LIC, SBI चा पैसा ‘अदानी’ यांना; …एवढी भीती कशाची? राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल 

आत्तापर्यंत गुजरातच्या एकाही नेत्याने तिकडे पाहिली नाही किंवा याबाबत आवाज उठवला नाही. निदान एक ट्विट तरी करा म्हणजे इथे राहणाऱ्या आमच्यासारख्या अज्ञानी हिंदूंचे भविष्य वाचेल

असे ट्विट करत या तरुणाने राज ठाकरे यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. आता राज ठाकरे या तरुणाची मदत करतातकी नाही, हे पाहणं औचूकतेचं ठरणार आहे.

Tags

follow us