चोर म्हटल्यावर कारवाई होत असेल तर आम्ही… नाना पटोले बरसले

चोर म्हटल्यावर कारवाई होत असेल तर आम्ही… नाना पटोले बरसले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक व्यवस्थेला सत्ताधारी लोकं संपवत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर नाना पटोलेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी बातमी; राहुल गांधींची खासदारकी रद्द; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया…

नाना पटोले म्हणाले, जे लोकं चोर आहेत त्यांना चोर बोलल्यानंतर कारवाई होत तर आजपासून त्यांना आम्ही डाकू म्हणत असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या आणि गौतम अदानी ही लोकं देश बरबाद करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.

जी लोकं देशाला लुटणारे त्यांचा विरोध आम्ही करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच आता राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर आम्ही जनतेला न्याय मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

आम्हाला मिंधे म्हणता, चोर-गद्दार म्हणता त्याचे काय ? ; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना सवाल

दरम्यान, आम्ही सर्व विरोधी पार्ट्यांना संपवणार असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले होते, आता जनतेची साथ घेऊन आम्ही यांना सत्तेतून खाली खेचणार असल्याचं आव्हानही त्यांनी दिलंय.

मोदी अडनावावरुन राहुल गांधींनी टीका केली होती. या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता राहुल गांधीची खासदारकी लोकसभेच्या सचिवालयाकडून रद्द करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube