फक्त ट्रम्पला बोलावून शेतकऱ्याचं श्राद्ध घालणं बाकी; भारत–अमेरिका ट्रेड डिलनंतर शेतकरी नेते भडकले

India US Trade Deal चा भारतातील शेती क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या कराराविरोधात शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत.

India US Trade Deal

India US Trade Deal Farmer leaders Agressive due to deals major impact farmers in India : भारताच्या उद्योग आणि निर्यात क्षेत्रासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ कमी करून 18 टक्के पर्यंत आणला आहे. मात्र याचा भारतातील शेती क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या कराराविरोधात शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत.

व्यापार करार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार – राजू शेट्टी

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत संमती मिळाली आहे. या मुक्त व्यापार करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. या करारामुळे अमेरिकन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका, सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थ, कापूस आदी उत्पादने भारतात आयात करता येणार आहेत. याचा मोठा फटका भारतातील शेतकरी आणि दुग्धोत्पादकांना बसणार आहे.

SHE Marts : बजेटमध्ये घोषित झालेलं SHE Marts मिशन काय? काय विकता येणार, अर्ज कसा करायचा?

या कराराचा फायदा अंबानी यांना, रिलायन्स इंडस्ट्रीजला होईल; मात्र भारतीय साखर उद्योग मोडून पडेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आमच्या ५६ इंच छातीच्या पंतप्रधानांनी नांगी टाकून या करारावर सही केली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला संमती देणारा करार आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांना बोलावून एकदा भारतीय शेतकऱ्याचा श्राद्ध घालणे एवढेच बाकी राहिले आहे.

करार भारतीय शेती उध्वस्त करणार – अजित नवले

आता अमेरिकेतून भारतात होणाऱ्या आयातीवर शून्य टक्के आयातकर असणार आहे. परिणामी अमेरिकेतील अनुदानामुळे स्वस्त झालेले, विकसित तंत्रज्ञानामुळे प्रतिहेक्टरी उत्पादन अधिक असलेले सर्व प्रकारचे शेतीमाल भारतात मोठ्या प्रमाणात आयात होतील. दुसऱ्या बाजूला भारतातून अमेरिकेत शेतीमाल निर्यात करण्यासाठी १८ टक्के टॅरिफ असणार आहे. परिणामी भारतातून अमेरिकेत शेतीमाल निर्यात करण्यात मर्यादा येणार आहेत. यामुळे भारतीय शेतकऱ्यांवर मोठे संकट येणार आहे, असे शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितले.

follow us