महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; अविनाश जाधवांसह १५ ते २० जणांवर आरोप

  • Written By: Published:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; अविनाश जाधवांसह १५ ते २० जणांवर आरोप

MNS controversy : विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य मिळालं नसल्याची (MNS) तक्रार केल्याच्या काही तासातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे लोकसभा अध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मनसेचे अविनाश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या १५ ते २० जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे पालघर व्यतिरिक्त उर्वरित पाच ठिकाणी उमेदवार दाखल केले होते. या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य व आवश्यक सहकार्य न मिळाल्याने या सगळ्यांचा दारुण पराभव झाला होता. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी पालघरच्या आपले मन मोकळे करत व्यथा मांडली होती.

उद्धव अन् राज ठाकरे एकत्र येणार? दानवे म्हणाले,एकत्र यायचं की नाही यावर.

निवडणुकीमध्ये पक्षाकडून पुरवण्यात आलेली आर्थिक रसद जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून स्थानीय पातळीवर मिळाली नसल्याची तक्रार बैठकीत पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती. याबाबत अविनाश जाधव यांना वरिष्ठांकडून विचारणा केल्यानंतर त्यांनी ठाणे व पालघर जिल्हा पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

पालघरच्या स्थानीय नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्याविरुद्ध थेट तक्रार केल्याचा राग मनात धरून अविनाश जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या १५ ते २० जणांनी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास समीर मोरे यांच्या तारापूर औद्योगिक वसाहतीच्या वेशीवर असणाऱ्या पाम गावातील कार्यालयात शिरून समीर मोरे यांना मारहाण केली तर त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून पळ काढला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube