Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा जोर वाढला; सुमारे २० जिल्ह्यात यलो अलर्ट जारी
Maharashtra Monsoon Update : राज्यात अनेक भागांमध्ये (Rain) ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला आहे. तर, काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यात ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाल्याने दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत आहे. राज्यात आज आणि उद्या काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कमी दाबाचा पट्टा
परतीचा मान्सून उत्तर भारतातून वेगाने पुढं महाराष्ट्रात आला आहे. पंरतु, तो नंदूरबारमध्येच अडखळला आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि उकाडा असं वातावरण तयार झाले आहे. आज आणि उद्या रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विधानसभेच्या रणांगणाची पहिली झलकं; राज्यात आज दसरा मेळाव्यांचं वादळ, कुणाचा आवाज कुठं घुमणार
आजपासून (12 ऑक्टोबरपासून) पुढील 5 दिवस म्हणजे 16 ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर अशा 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस पुन्हा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
विजांच्या कडकडाटांसह पाऊस
पुणे शहरात काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये दुपारी ऊन आणि संध्याकाळी पाऊस असं संमिश्र वातावरण दिसून येत होतं. अचानक विजांच्या कडकडाटांसह शहर परिसरात सरी कोसळल्या. राज्यामध्ये एकीकडे परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहे. तर, दुसरीकडे ‘ऑक्टोबर हीट’ जाणवत आहे.
या भागात यलो अलर्ट जारी
पालघर (12,13), ठाणे (12,13), रायगड (12,13), रत्नागिरी (12,13), धुळे (12,13), नंदूरबार (12,13), धुळे (12,13), नाशिक (12,13), पुणे (12,13), छत्रपती संभाजीनगर (12,13), कोल्हापूर (12,13), सातारा (12), जालना (12), बीड (12), अकोला (12), अमरावती (12), बुलडाणा (12,13), वर्धा (12,13), वाशिम (12,13), यवतमाळ (12,13)