काश्मीर हल्ल्यात पुण्याचे कौस्तुभ गणबोटे गेले, “माझा लाडका पुतण्या” म्हणत काकूंनी फोडला टाहो..

काश्मीर हल्ल्यात पुण्याचे कौस्तुभ गणबोटे गेले, “माझा लाडका पुतण्या” म्हणत काकूंनी फोडला टाहो..

Jammu Kashmir Terror Attack : “माझ्या पुतण्याचा स्वभाव खूप चांगला होता. मनमिळाऊ होता. आधी आम्ही एकत्र कुटुंबातच राहत होतो. लहानपणी मी त्याला अंगाखांद्यावर खेळवलं. माझा खूप लाडका पुतण्या होता तो..” असे शब्द तोंडातून येताच काकूंना हुंदका अनावर झाला अन् डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. पाणावलेले डोळे पदराने पुसत काकूंनी दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या आठवणी सांगितल्या.

मंगळवारी दुपारी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म कोणता असं विचारून गोळ्या घातल्या. या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील एक कौस्तुभ गणबोटे देखील आहेत.

Pahalgam Terrorists Attack : हिंदू अन् मुस्लिम वेगळे..,; पाकिस्तानी आर्मी चीफच्या भाषणाने ठिणगी? काश्मीरात नरसंहार

कौस्तुभ गणबोटे त्यांच्या कुटुंबियांसह काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. मात्र येथून ते परत आलेच नाहीत. दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यातून त्यांची पत्नी मात्र बचावल्या आहेत. कौस्तुभ गणबोटे फरसाण व्यावसायिक होते. पुण्यात राहत होते. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. वयोवृद्ध काका काकूंना पुतण्याच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या.

माझ्या पुतण्याचा स्वभाव मनमिळाऊ होता

तुमचा कौस्तुभ गणबोटे यांच्याशी काही संपर्क झाला होता का, असे विचारले असता मला माहिती नव्हतं की ते काश्मीरला गेले आहेत. मोठ्या सूनेनं सांगितल्यानंतर मला समजलं. घरच्यांशी अजूनही संपर्क झालेला नाही. कौस्तुभच्या पत्नीचा फोन आला. तिने सगळं सांगितलं. माझ्या पुतण्याचा स्वभाव खूप चांगला होता. खूप मनमिळाऊ स्वभावाचा होता माझा पुतण्या. माझा खूप लाडका पुतण्या होता तो. आमचं सगळं एकत्र कुटुंब होतं. व्यवसायामुळे कौस्तुभ कोंढव्यात स्थायिक झाले होते. त्यांचा फरसाणचा व्यवसाय आहे. कौस्तुभची पत्नी देखील त्याला या व्यवसायात मदत करते. त्याची पत्नी संगिता सुरक्षित आहे असे कौस्तुभ गणबोटेंच्या काकूंनी सांगितले.

Pahalgam Terror Attack Live : आता बदल्याची वेळ! पहलगामच्या जंगलात सर्च ऑपरेशन, तिघांचे स्केच जारी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube