सांगली जिल्हा बँक नोकर भरतीत जयंत पाटलांना झटका, फडणवीसांकडून स्थगिती देत नव्याने भरतीचे निर्देश

Sangli District Bank recruitment प्रकरणी आता राज्य सरकारने ही भरती स्थगित करत नव्याने भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.

Untitled Design (1)

Jayant Patil suffers setback in Sangli District Bank recruitment, Fadnavis suspends recruitment and directs fresh recruitment : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील नोकर भरती प्रकरणी गेले काही दिवसांपासून आरोप केले जात होते.याबाबत आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानंतर आता राज्य सरकारने ही भरती स्थगित करत नव्याने भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.

सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरती जयंत पाटलांना झटका

राज्य सरकारने ही भरती स्थगित करून आयबीपीएस किंवा टीसीएस यापैकी कोणत्याही एका कंपनीची निवड करून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश दिले आहेत त्यामध्ये 559 जागांची नोकर भरती केली जाणार होती. दरम्यान या बँकेतील अगोदरच्या नोकर भरती आणि घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच नवीन 561 जागांच्या नोकर भरतीला परवानगी दिल्याने सहकार मंत्र्यांवर टीका केली जात होते.

MPSC चं सुधारित वेळापत्रक जाहीर! पूरपरिस्थितीमुळे काही परीक्षा पुढे ढकलल्या, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना…

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.मात्र ही चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अशी मागणी खोत आणि पडळकर यांनी केली होती. त्याचबरोबर पूर्वी झालेल्या नोकर भरती घोटाळ्याची चौकशी देखील केली जावी.राज्य सरकारने नव्याने नोकर भरती करण्याचे जे काही सूचना दिले आहेत ती भरती किंवा आयबीपीएस या कंपन्यांच्या माध्यमातून केली जावी अशी मागणी आम्ही केली आहे ही मागणी नक्कीच विचारात घेतली जाईल असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशी बाबत माहिती दिली

follow us