The Kerala Story च्या दिग्दर्शकाला फाशी द्या; जितेंद्र आव्हाड यांची मागणी

The Kerala Story च्या दिग्दर्शकाला फाशी द्या; जितेंद्र आव्हाड यांची मागणी

Jitendra Awhad On The Kerala Story : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story)या चित्रपटाच्या निर्मात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज जोरदार निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी तर दिग्दर्शकाला जाहीर फाशी द्यावी अशी मागणी केली आहे. केरळच्या कथेच्या नावाखाली एक राज्य आणि तेथील महिलांची बदनामी (Denigration of women)करण्यात आली, असेही आमदार आव्हाडांनी म्हटले आहे. चित्रपटात केरळमधील 32 हजार हिंदू तरुणींचं धर्मांतर (Conversion of Hindu girls) करून त्यांच्यासोबत लव्ह जिहाद (Love Jihad)झाल्याचा दावा करत दिग्दर्शक सुदिप्तो सेन (Sudipto Sen)यांनी द केरळ स्टोरी चित्रपटात केला आहे.

Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसारख्या राज्यांनी चित्रपटाच्या वादग्रस्त आशयामुळे या चित्रपटावर बंदी घातली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही आता चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले आहे. चित्रपट बनवल्याबद्दल दिग्दर्शकाला भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. त्यावरुन आता केरळसह विविध राज्यांमध्ये राजकीय वादंग पेटलं आहे. सुरुवातीला 32 हजार महिलांची कथा सांगणारा चित्रपट फक्त तीन महिलांच्या कथेवर कसाकाय आला? असा सवालही यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज देशातील सर्वाधिक साक्षरता प्रमाण असलेल्या केरळची या चित्रपटातून बदनामी करण्यात आली आहे. या चित्रपटातून हिंदू महिलांना, बहिणींना अक्कल नसते असं आपण दाखवतो आहे, हे फार वाईट असल्याचं यावेळी त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रपोगंडा राबवण्यासाठी काल्पनिक चित्र तयार करणाऱ्या द केरळ स्टोरीच्या दिग्दर्शकाला भरचौकामध्ये फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदार आव्हाडांनी केली आहे.

केरळची आजची परिस्थिती वेगळी आहे. केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण 96 टक्के आहे. तर भारताच्या साक्षरतेचे प्रमाण 76 टक्के आहे. भारतात परदेशातून येणारा 36 टक्के पैसा हे केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये भारतात पाठवले, त्यामुळे अशा राज्याची केरळ स्टोरी चित्रपटाच्या माध्यमातून बदनामी करणं योग्य नाही, असंही यावेळी जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube