मतदान कर्नाटकात पण महाराष्ट्रातल्या कामगारांना पगारी सुट्टी…

मतदान कर्नाटकात पण महाराष्ट्रातल्या कामगारांना पगारी सुट्टी…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या सीमालतच्या सहा जिल्ह्यांतील कामगारांना पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, कर्नाटकात 10 मे रोजी एकाच टप्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहे.

Karnataka : कॉंग्रेसकडून ‘फोडा अन् राज्य करा’चं राजकारण; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातल्या सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांतील ज्या मतदारांची नावे कर्नाटक राज्यांत आहेत, त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Bhaurao Karhade: मोठी बातमी! ‘माफ करा ‘TDM’ प्रदर्शन थांबवतोय’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा मोठा निर्णय

कर्नाटकात सध्या भाजपची (BJP) सत्ता आहे. तर काँग्रेस (Congress) विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. दक्षिण भारतातील एकमेव कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपसमोर मोठं चॅलेंज असणार आहे.

Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप

सध्या भाजपकडे 117, काँग्रेसकडे 69, जेडीएसकडे 32 आणि इतरांकडे सहा जागा आहेत. आता पुन्हा भाजप सत्तेवर येणार का? याचं उत्तर 13 मे रोजीच निवडणुकांच्या निकालानंतर मिळणार आहे.

दरम्यान, कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने 29 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती होती. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर कर्नाटकात आजपासूनच आचारसंहिता लागू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube