‘2 वर्षांपूर्वीच कळलं तर तेव्हाच आवाज का उठवला नाही? बिडवलकर हत्येवरून राणेंचा नाईकांवर हल्ला

Nilesh Rane on Vaibhav Naik for Prakash Bidvalkar Murdur : कोकणातील चेंदवन नाईकवाडी येथे 2 वर्षांपूर्वी प्रकाश बिडवलकर या तरूणाचा खून झाला होता. या प्रकरणी अद्याप देखील आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र यामध्ये माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट करत या हत्या बद्दल प्रश्न उपस्थित केले होते तसेच या प्रकरणातील संशयित आरोपी हा निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या संबंधित असल्याचा आरोप देखील यावेळी नाईक यांनी केला होता.
मोठी बातमी : अपघातग्रस्त रूग्णांना 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार; फडणवीस सरकारचा निर्णय
त्यावर आता स्वतः निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले आहे तसेच वैभव नाईक यांना या घटनेबाबतचे व्हिडिओ आणि फोटो दोन वर्षांपूर्वीच माहिती होतं तर त्याचवेळी का नाही सांगितले किंवा पुढे आणले असा सवाल करत राणे आक्रमक झाले आहेत.
धक्कादायक! तैवानच्या सैन्यात चीनची घुसखोरी; पोलखोल झाल्यानंतर उडाली खळबळ
काय म्हणाले निलेश राणे?
ही केस दोन वर्षांपूर्वी रजिस्टर झाल्याचं वैभव नाईक म्हणाले मात्र ती तेव्हा झालेली नाही. ती 2025 मध्ये रजिस्टर झाली. पण ज्याप्रमाणे तुम्ही म्हणाल ते दोन वर्षापूर्वीच टक्के आवाजातील प्रकरणाबद्दल तुम्हाला माहिती होते तर त्यावेळी तुम्ही आमदार असूनही यावर कारवाई का केली नाही. पोलिसांकडे न जाता सोशल मिडीयावर याबाबत माहिती का दिली?
तसेच पोलिसांवर तुमचा विश्वास नव्हता तर दोन दिवसांनी कसा विश्वास का बसला? तर दोन वर्षांनी ही तक्रार का केली. तसेच याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी पत्रकार परिषद घेत निलेश राणे नाही तर प्रकाश बिडवलकर या तरूणाचा खूनाशी संबंधित संशयित आरोपी हे वैभव नाईकांच्या जवळचे असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या सोबत तो बाबरत देखील होता. असंही ते म्हणाले.