लेकीचे युक्रेनमध्ये निधन, 12 दिवसांनी आईला अंत्यदर्शन, फडणवीसांच्या संवेदनशीलतेची ‘प्रचिती’

लेकीचे युक्रेनमध्ये निधन, 12 दिवसांनी आईला अंत्यदर्शन, फडणवीसांच्या संवेदनशीलतेची ‘प्रचिती’

Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या संवेदनशीलतेची प्रचिती नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आली. एका तरूणीच्या युक्रेन या युद्ध सदृश्य देशात निधन झाले. त्यामुळे लेकीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही. या काळजीने माता हतबल झाली होती. मात्र फडणवीस यांनी अगदी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करून मुलीचे पार्थिव मायदेशी आणले आणि मातेला अंत्यदर्शन घडविले.

काय आहे नेमकी घटना?

प्रचिती पवार ही मूळची रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राहणारी मुलगी. प्रचितीचे वडील मुंबई पोलीस दलात होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तर प्रचिती ही युक्रेन येथे एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात ती शिकत होती. तर तिची आणि मामा हेच तिचे घरातील दोन व्यक्ती रोहा येथे राहत होते. मात्र केसपुळीचे निमित्त झाले आणि सेफ्टीक होऊन तिचा 2 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.

INDIA आघाडीपासून आणखी एक पक्ष दुरावला : फारुख अब्दुल्लांची स्वबळावर लढण्याची घोषणा

मात्र युक्रेन या युद्ध सदृश्य देशात निधन झाले. त्यामुळे लेकीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही. या काळजीने माता हतबल झाली होती. यामुळे आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. लेकीला एकदा शेवटचे पाहता यावे अशी एकच इच्छा होती. या संकटात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मदत करू शकतील. याची खात्री असल्याने एका परिचिताने त्यांना मेसेज केला. मदतीसाठी येणाऱ्या कोणत्याही मेसेजची दखल फडणवीस घेतातच.

‘मूळ राष्ट्रवादीचे ‘दादा’ अजित पवारच’; विधानसभा अध्यक्षांचा शरद पवार गटाला दणका

त्यानुसार या घटनेने देखील देवेंद्र फडणवीस यांचे मन हेलावून गेले. त्यांनी तातडीने सूत्रे फिरवायला सुरुवात केली. आपले खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्विय सहाय्यक मनोज मुंडे यांना सूचना केल्या. फडणवीस स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्याशी बोलले. परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेनमधील भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क साधून दिला. प्रचितीला मायदेशी घेऊन येण्याचे ऑपरेशन हाती घेण्यात आले.

राज्यसभेतही दिसले भाजपचे धक्कातंत्र : सात मंत्र्यांसह दिग्गजांना डावललं… तब्बल 24 नवख्यांना उमेदवारी!

फडणवीस स्वतः प्रत्येक वेळी अपडेट घेत होते. आवश्यक सूचना करत होते. सर्व अडचणी दूर होऊन प्रचितीचे पार्थिव मुंबई विमानतळावर पोहोचले. फडणवीस यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. भाजप सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक प्रकाश गाडे तेथे उपस्थित होते. तेथून प्रचितीचे पार्थिव 14 फेब्रुवारी रोजी रोहा येथे पोहोचविण्यात आले. काल तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Shah Rukh Khan: चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘डंकी’ ओटीटीवर रिलीज

युक्रेनपासून दिल्लीपर्यंत सर्व यंत्रणाशी देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केल्यामुळे एका मातेला लेकीचे अंत्यदर्शन घडू शकले. या बारा दिवसांच्या काळात सर्व धावपळीतून वेळ काढून फडणवीस स्वतः सगळे अपडेट घेत होते. त्याचबरोबर प्रचितीच्या कुटुंबीयांनाही प्रत्येक अपडेट पोहोचतील असे पाहत होते.

त्यांच्यामुळे हतबल झालेल्या कुटुंबियांना आधार देऊन एका आईला आपल्या लेकीला अखेरचा निरोप देता आला. मानवतेचे उदाहरण घालून दिले. अशी कृतज्ञ भावना प्रचितीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. तसेच या घटनेतून देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडले. अगदी एका मेसेजवर संकटात सापडलेल्या नागरिकाला मदत करण्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube