महायुतीत जागावाटपावरून तिढा! रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचीच; राणे शड्डू ठोकत मैदानात

  • Written By: Published:
महायुतीत जागावाटपावरून तिढा! रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचीच; राणे शड्डू ठोकत मैदानात

Narayan Rane : येत्या पंधरा दिवसांत लोकसभा निवडणुकांच (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू झाली आहे. महायुती आणि मविआत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज सकाळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर ठोकला होता. त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) प्रतिक्रिया दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर भाजपचा दावा असल्याचं राणेंनी म्हटलं आहे.

नेटफ्लिक्सला दिलासा, The Indrani Mukerjea Story ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून संपूर्ण राज्यात चर्चा आहे. या मतदारसंघावरून महायुतीमधील तिढा अद्याप कायम असल्याचं दिसतं. उदय सामंत यांनी या जागेवर दावाा केल्यानंतर मंत्री नारायण राणे यांनी महायुतीतील शिंदे गटाच्या नेत्यांनी सूचक इशारा दिला. राणेंनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाच बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे, असं राणे म्हणाले.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल, दोन खेळाडू बाहेर

रत्नागिरी-सिंधुदूर्गसाठी किरण सामंत हे शिवसेनेच्या शिंदे गटातून फायनल झाल्याची चर्चा आहे. तशा पोस्ट सोशल मीडियावरही कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्या आहेत. किरण सामंत यांनी नारायण राणे यांचे आशीर्वाद घेत असल्याचा व्हिडिओ चार दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. अशातच आता राणेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची आहे, असं ट्विट केलं. त्यामुळं या जागेवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचं दिसतं. त्यामुळे आता महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये कोणाला उमेदवारी मिळते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान, महायुतीचा भाजपचा उमेदवार कोणीही असला तरी विनायक राऊत यांचा विजय निश्चित असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. मात्र किरण सामंत शिंदे गटाकडून उभे राहिल्यास विनायक राऊत यांना खूप मेहनत करावी लागणार असल्याचं बोलल्या जातं.

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube