मोठी बातमी! मालवण राड्या प्रकरणी ४२ जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांची कारवाई
Maharashtra News : मालवणमधील राजकोट किल्ला परिसरात बुधवारी मोठा राडा झाला. येथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि माजी मंत्री नारायण राणेंचे (Narayan Rane) कार्यकर्ते भिडले. या वादात किल्ल्याच्या भिंतीचे नुकसानही झाले. यानंतर ठाकरे आणि राणे गटातील राजकीय संघर्ष उफाळून आल्याचे पाहण्यास मिळाले. या घटनेवरून काल दिवसभर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने होते. तर दुसरीकडे प्रशासनानेही कारवाई सुरुच ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार मालवण पोलिसांनी 42 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
राणे धमक्या देतील असं वाटत नाही, त्यांची बोलण्याची पद्धतच.. मालवण राड्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
ज्यांची नावं माहिती आहेत अशा 42 जणांवर शेकडो अज्ञातांवर विविध कलमान्वये गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विना परवाना जमाव गोळा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यांसारख्या कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या ठिकाणी कोणताही अयोग्य प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. या परिसरात अजूनही पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.
नेमकं काय घडलं होतं ?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) पुतळा कोसळल्याने भाजप खासदार नारायण राणे काल दुपारी बारा वाजता किल्ला परिसरात आले होते. नेमक्या याच वेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेही आपल्या (Aditya Thackeray) कार्यकर्त्यांसह येथे आले होते. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊतही त्यांच्याबरोबर होते. आदित्य ठाकरे येथे आल्यानंतर राणे समर्थकांनी त्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मग ठाकरे गटाच्या समर्थकांनीही घोषणा दिल्या.
त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. वाद मिटवण्यासाठी जयंत पाटील यांनी मध्यस्थी केली. नारायण राणे, निलेश राणे यांना समजाावण्याचा प्रयत्न केला. आम्ही स्थानिक आहोत. आदित्य ठाकरे बाहेरून आले आहेत. त्यांना आधी येथून बाहेर काढा असे निलेश राणे म्हणाले. यानंतर नारायण राणेंनीही आक्रमक भूमिका घेत आम्ही येथून हटणार नाही पोलिसांनी गोळ्या घालायच्या असतील तर घालाव्यात असे सांगितले.
शिंदे सरकारचं वाढणार टेन्शन, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; आजच करणार मूक आंदोलन
यानंतर ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांनी मुख्य रस्ता मोकळा करावा आम्ही मागच्या दाराने जाणार नाही असे सांगितले. कुणीही माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.