लोकसभेत पाठिंबा, कोकण पदवीधरमध्ये मनसे-भाजप आमने-सामने? अभिजित पानसेंना उमेदवारी

लोकसभेत पाठिंबा, कोकण पदवीधरमध्ये मनसे-भाजप आमने-सामने? अभिजित पानसेंना उमेदवारी

Vidhan Parishad Election MNS candidate Abhijit Panse oppose BJP : राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांची ( Vidhan Parishad Election ) घोषणा झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ( MNS ) कोकण पदवीधर मतदार संघामध्ये अभिजीत पानसे ( Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करत या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Pune Accident मध्ये ससून कनेक्शन; अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, डॉ. तावरेंना अटक

दरम्यान एकीकडे राज्यातील राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेनेने लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला कोणत्याही अटी शर्थींविना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोकण पदवीधर मतदार संघामध्ये भाजप आणि मनसे यांच्यामध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ही उमेदवारी मनसेची महायुती म्हणून असेल तर भाजपच्या येथील विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांचा पत्ता कट होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Israel Hamas War : इस्त्रायलपुढे मोठं आव्हान; राजधानी तेल अवीववर हमासचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला

या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.’ असं लिहीत मनसेकडून पानसे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज