लाडक्या बहिणींवर केवायसीची टांगती तलवार! दोन महिन्यानंतर अपात्र लाभार्थी…
Ladakai Bahin Yojana मध्ये अनेक मोठे गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
          Ladaki Bahin Yojana Beneficiary shold E-Kyc in 2 months then ineligible will remove : राज्यामध्ये गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक मोठे गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये निकषात न बसणाऱ्या अनेक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच महिलांच्या नावे पुरुषांनी देखील अर्ज केल्याचे माहिती उघड झाली आहे. त्यामुळे यापुढे या योजनेमध्ये असा घोळ होऊ नये. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
लाडक्या बहिणींवर केवायसीची टांगती तलवार!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक मोठे गैरव्यवहार झाल्याचा समोर आला आहे. त्यामुळे आता राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये कोणतीही योजना तात्काळ राबवण्यासाठी राज्यातील महिलांची संपूर्ण माहिती उपलब्ध असावी. त्यासाठी आता अपात्र लाभार्थ्यांना वगळून एक गोल्डन डेटा राज्य सरकारने तयार केला आहे. हा डेटा पूर्ण झाला आहे.
Pune : MPSC करणाऱ्या 6 रुममेट्समध्ये राडा, चिकन बनवणाऱ्या मैत्रिणीला शिवीगाळ करत झोडपलं
त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने एक वेब पोर्टल देखील तयार करून केले आहे. या वेब पोर्टलवर लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी पुढील दोन महिन्यात ई केवायसी करणे करावी. असं आवाहन महिला व बालकल्याण मंत्री अतिरी तटकरे यांनी केला आहे.
रशियातील कामचटकामध्ये पुन्हा भूकंप! 7.8 रिश्टर स्केलच्या धक्क्यांनंतर त्सुनामीचाही इशारा
ही एक केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याचबरोबर केवळ पात्र महिलांना ज्या योजनेचा लाभ दिला जाईल असे देखील यावेळी त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना ईकेवायसी करावी लागणार आहे. ज्यामध्ये त्या पात्र ठरल्या नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणे थांबला जाईल.
