अर्थमंत्र्याने सामाजिक न्याय विभागाचा 746 कोटींचा निधी पळवला, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; हाकेंची मागणी

अर्थमंत्र्याने सामाजिक न्याय विभागाचा 746 कोटींचा निधी पळवला, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; हाकेंची मागणी

 

Laxman Hake : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी (Ladaki Bahin Yojana) सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी रुपयांचा निधी महिला बालविकास विभागाला (Women and Child Development Department) वर्ग केलाय. यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाक (Laxman Hake) चांगलेच संतप्त झाले. त्यांनी अर्थमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केली. अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी हाकेंनी केली.

अर्थमंत्र्याने सामाजिक न्याय विभागाचा 746 कोटींचा निधी पळवला, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; हाकेंची मागणी 

लक्ष्मण हाके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी हतबलता व्यक्त केली. पण, मला अर्थमंत्री अजित पवारांच्या हेतूवर शंका आहे. अर्थखात्यावर अजितदादा ठाण मांडून बसलेत. कायद्याने सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्यत्र वळवता येत नाही. पण अर्थमंत्री सर्व कायदे धाब्यावर बसवून मनमानी कारभार करताहेत. त्यांनी एससी विभागाचे 410 कोटी आणि एसटी विभागाचे 350.5 कोटी रुपये असे एकूण 746 करोड रुपये वेगवेगळ्या खात्यात वळवले. अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला, त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी हाकेंनी केली.

कॉंग्रेसचा कार्यकर्ता अस्वस्थ, केवळ नॅरेटीव्हवर काम करून पक्ष वाढत नाही; बावनकुळेंचा हल्लाबोल 

सहकार खात्याचं बजेट लाडक्या बहिणींकडे का वळवलं नाही?, असा सवालही हाकेंनी केला. पुढं ते म्हणाले, शासनाने लोककल्याणकारी योजना राबवाव्या, यात दुमत असण्याचं कारण नाही. पण, अजितदादांच्या एका कारखान्याचं जेवढं उत्पन्न आहे, तेवढा सामाजिक न्याय विभागाचं बजेटही नाही. महाज्योतीवर सार्थीच्या तुलनेत अजित पवारांनी अन्याय केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ते साडेआठ हजार कोटीचा निधी देतात. पण, ओबीसी समाजाला फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एकूण बजेटपैकी एक टक्कांही तरतूद केली जात नाही, अशी टीका हाकेंनी केली.

शिरसाट साहेब, राजीनामा द्या…
यावेळी हाकेंनी संजय शिरसाट यांच्यावरही भाष्य केलं. समाजापेक्षा कोणी मोठं असत नाही, शिरसाट साहेब तुम्ही एससी, एसटी बांधवांच प्रतिनिधीत्व करता. पण, तुम्हाला निधी मिळत नसेल तर राजीनामा द्या, तुम्हाला सत्ता प्यारी आहे का, असा सवाल हाकेंनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube