ब्रेकिंग! बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायाबद्दल कारवाई; संजय राऊतांचं ट्विट
Legislative Council Election Bal Mane expelled from UBT कोकणात एक धक्कादायक ट्विस्ट उबाठाचे माने यांनी राणेंसोबत जात परस्पर अर्ज माघारी घेतला
Legislative Council Election Bal Mane expelled from UBT for anti-party activities : राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना राज्यामध्ये राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यातच कोकणात एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. तो म्हणजे मविआचे उबाठाचे उमेदवार बाळ माने यांनी भाजपच्या नितेश राणेंसोबत जात परस्पर अर्ज माघारी घेतल्याने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
याबाबत ट्विट करताना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलं की, बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.
बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे,
पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 4, 2026
नेमकं प्रकरण काय?
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली. विशेष म्हणजे, अर्ज मागे घेण्यासाठी ते भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते.
शिंदेंच्या दोन उमेदवारांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा! ठाणे अन् यवतमाळमध्ये विधान परिषद बिनविरोध
या अनपेक्षित निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला. घडामोडीनंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने कारवाई करत बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भातील माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.
बाळ माने कोण आहेत?
विधानपरिषद निवडणुकीतील या घडामोडीनंतर बाळ माने हे नाव राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. त्यांची राजकीय वाटचालही लक्षवेधी राहिली आहे.
बाळ माने यांनी अनेक वर्षे भारतीय जनता पक्षात सक्रिय भूमिका बजावली असून कोकणातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी रत्नागिरी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील जागावाटपामुळे उमेदवारीची शक्यता कमी झाल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि शिवसेना (ठाकरे गट)मध्ये प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
या निवडणुकीत त्यांची लढत मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात झाली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.निवडणुकीतील पराभवानंतरही पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास कायम ठेवत त्यांची उपनेतेपदी नियुक्ती केली होती. यानंतर विधानपरिषदेची उमेदवारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयामुळे बाळ माने पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे कोकणातील तसेच राज्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.