राहुल गांधींची खासदारकी रद्द, अजित पवारांनी केला निर्णयाचा धिक्कार..

राहुल गांधींची खासदारकी रद्द, अजित पवारांनी केला निर्णयाचा धिक्कार..

Rahul Gandhi Disqulified : सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना आज दुपारी जाहीर केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. या निर्णयानंतर आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा मोठा संघर्ष सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.

यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयाचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत असे कधी घडल्याचे आठवत नाही. हा त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे. हा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा निर्णय आहे.

वाचा : राहुल गांधींची खासदारकी रद्द; महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ, विरोधकांचा सभात्याग

ते  पुढे म्हणाले, की याआधी इंदिराजींच्या बाबतीतही असेच घडले होते. त्यावेळचं सरकार थोड्या वेगळ्या पद्धतीनं वागलं. ज्या इंदिरा गांधींना 1977 साली आणीबाणीच्या निमित्ताने पराभूत केले होते त्याच इंदिरा गांधींना 1980 साली पुन्हा सत्तेत बसविण्याचे काम लोकशाहीनंं केलं. त्यामुळे आत्ताच्या घटना सामान्य माणसांना आजिबात पटणाऱ्या नाहीत.

मोठी बातमी; राहुल गांधींची खासदारकी रद्द; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया..

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराची खासदारकी रद्द केली गेली. वैचारिक मतभेद असू शकतात. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कुणाची खासदारकी रद्द केल्याचे आठवत नाही. प्रत्येकाला आपापली मते मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. पण आज लोकसभेने जो निर्णय घेतला तो लोकशाहीला धक्का देणारा आहे. या निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो, असे अजित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube