चलो तो सारे जमाने को साथ ले के चलो…; अर्थसंकल्प सादर करताना अजितदादांची शेरोशायरी

चलो तो सारे जमाने को साथ ले के चलो…; अर्थसंकल्प सादर करताना अजितदादांची शेरोशायरी

Maharashtra Budget 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आज दहाव्यांदा विधिमंडळात अर्थसंकल् (Maharashtra Budget 2024 ) सादर केला आहे. यामध्ये त्यांनी अनेक योजनांच्या घोषणा केली. अर्थसंकल्पात महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये, बेरोजगारांना दरमहा 5 हजार रुपये, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या घोषणा करताना अजित पवारांनी जोरदार शेरोशायरीही केली.

अजितदादांची शेतकऱ्यांना गुडन्यूज; कृषिपंपांचे थकीत वीजबिल माफीची घोषणा 

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने अजित पवारांनी अतिरिक्त अर्थसंकल्पाची सुरूवात केली. ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ अशा जयघोषाने विधिमंडळ भक्तिमय झाले होते. त्यानंतर शेतकरी, महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. अनेक योजनांची घोषणा करून हे सरकार शेतकरी, कष्टकऱ्यांचे सरकार असून सर्वांना सोबत घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं अजित पवारांनी दाखवून दिलं. यावेळी त्यांनी शेरोशारयीही केली. हयात ले के चलो, काएनात ले के चलो… चलो तो सारे जमाने को साथ ले के चलो, अशी शायरी अजित पवारांनी केली.

अन् शेलारांनी ‘त्या’ आठवणी सांगताच आशाताईंच्या डोळ्यात आलं टचकन पाणी 

सरकारने काय घोषणा केल्या?
1. महायुती सरकारने 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठीही घोषणा केली आहे. वारकऱ्यांसाठी प्रती दिंडी 20 हजार रुपये देण्याची घोषणा अजित पवारांनी केली.

2. अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. आपण महिलांना केंद्रस्थानी ठेवून प्रगतीची वाटचाल सुरू केली. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा रु. 1500 प्रदान करेल. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही योजना जुलै 2024 पासून लागू होईल, असे अजित पवार म्हणाले.

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदान 10,000 रुपये होते, परंतु आता ते 25,000 रुपये करण्यात आल्याचंही अजित पवार म्हणाले. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5 हजार अनुदान देण्यात येणार आहे. गायीच्या दुधावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणाही अजित पवारांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज