राहुल गांधींची खासदारकी गेली; बावनकुळे म्हणाले, सत्यमेव जयते !

राहुल गांधींची खासदारकी गेली; बावनकुळे म्हणाले, सत्यमेव जयते !

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualified)करण्याच्या निर्णयानंतर देशाच्या राजकारणात वादळ उठले आहे. या निर्णयानंतर विरोधी पक्ष सरकारवर अक्षरशः तुटून पडले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लोकशाहीला धक्का देणाऱ्या या निर्णयाचा धिक्कार केला आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यामागे सरकारचे मोठे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता सत्ताधारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विट केले आहे. त्यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे.

वाचा : राहुल गांधींची खासदारकी रद्द, अजित पवारांनी केला निर्णयाचा धिक्कार..

सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना आज दुपारी जाहीर केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. या निर्णयानंतर आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा मोठा संघर्ष सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यामागे मोठे कटकारस्थान; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप 

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी सुरत न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. या देशात संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही असे बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनीही या निर्णयावर मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, की हे खरंतर सुडाचं राजकारण आहे. नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरलेले आहेत. देशात अघोषित आणीबाणी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात नरेंद्र मोदी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत घट होत आहे.

Uddhav Thakeray : देशातील लोकशाही संपली… पंतप्रधानांनी हुकुमशाही घोषीत करावी!

 

काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींना भारत जोडो यात्रेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली आहे. पण, राहुल गांधींचा संसदेतील आवाज बंद करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांच्या शिक्षेची टांगती तलवार अजूनही राहुल यांच्या डोक्यावर आहे त्यात काय होईल माहिती नाही. पण, एका बाजूला शिक्षा करून  दोन वर्षांसाठी तुरुंगात डांबायचे. दुसरीकडे त्यांची खासदारकी रद्द करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा. ही पूर्णपणे सूड भावनेतून केलेली कारवाई आहे.

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू होते. कटकारस्थान रचून हा निर्णय घेण्यात आला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube