‘अनेकांना वाटलं माझी राख होईल, पण प्रत्येकवेळी मी…’ देवेंद्र फडणवीस मनातलं बोलले

Devendra Fadnavis In Mumbai

CM Devendra Fadanvis Statement In Phoenix Award : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलंय. राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टींनी मला आज इथपर्यंत आणलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मराठी पत्रकार संघातर्फे सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्यांना फिनिक्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

मी राखेतून उभा राहिलो

यावेळी बोलताना फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी पुरस्काराबाबत मिश्किल टिप्पणी करत उपस्थितांना हसवलं. ते म्हणाले, मला हा फिनिक्स पुरस्कार दिला म्हणजे मी राखेतून उभा राहिलो म्हणून (Maharashtra Politics) नाही. अनेकदा लोकांना वाटलं की माझं राजकारण संपलं, पण त्या क्षणी मी पुन्हा भरारी घेतली. ही भरारी शक्य झाली. कारण मी आव्हानांना कधी टाळलं नाही, नेहमी त्यांचा सकारात्मकतेने सामना (Phoenix Award) केला. आव्हानं कितीही मोठी असली तरी मी कधी माणसांचा द्वेष केला नाही, टोकाचं राजकारण केलं नाही. प्रत्येक भेटलेल्या व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं असतं, हे पाहण्याचा सातत्याने प्रयत्न मी (Mumbai) केला आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर

काही दिवसांपूर्वी मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं होतं. हजारो आंदोलक ठाण मांडून बसल्याने फडणवीस यांच्या नेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. सगळ्यांच्या नजरा या परिस्थितीवर त्यांनी कशी मात करणार याकडे लागल्या होत्या. मात्र, त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लावला. या वाटाघाटी यशस्वी ठरल्याने मराठा समाजाने मुंबईतील आंदोलन मागे घेतलं. या घडामोडी फडणवीस यांच्या मोठ्या राजकीय यशापैकी एक मानल्या जात आहेत.

‘देवाभाऊ’ जाहिरात मोहिमेची चर्चा

या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राज्यातील प्रमुख मराठी, हिंदी आणि इंग्रजी दैनिकांमध्ये ‘देवाभाऊ’ या नावाने जाहिराती झळकल्या. त्याचबरोबर सोशल मीडियावरही ही मोहीम राबवण्यात आली. या जाहिरातींमधून फडणवीस यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला न्याय मिळाल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube