बिहारमध्ये पराभव दिसू लागल्याने रडगाणं सुरू; DCM शिंदेंची राहुल गांधींवर जळजळीत टीका

Eknath Shinde on Rahul Gandhi Press Conference about ECI and Votes : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप करत कर्नाटक लोकसभा आणि हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा आरोप केला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात 40 लाख संशयित मतदार असल्याचा दावा केला. त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाष्य केलं.
तरुणाईला कॅन्सरचं ग्रहण! ‘या’ कॅन्सरचा धोका वाढतोय; धक्कादायक कारणं समोर…
बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने राहुल गांधींचे रडगाणे सुरु आहे, अशी टीका शिंदेंनी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधींनी केलेल्या आरोपाविषयी विचारले असता शिंदे म्हणाले, मी एवढंच सांगतो की, राहुल गांधी यांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम बंद करावे, जेव्हा ते हरतात, तेव्हा ते असे आरोप करतात. आता ते बिहार निवडणुकांमध्येही हरणार आहेत. याचा अंदाज आता त्यांना लागलेला आहे. त्यामुळं हे रडगाणं सुरू आहे, असं शिंदे म्हणाले.
शिंदे पुढे म्हणाले, त्यांच्या काळात सगळ्यात मोठा निवडणूक आयोगामध्ये झालेला घोटाळी मी तुम्हाला सांगतो. सर्वात मोठा स्कॅम… मनमोहन सिंग सरकारमध्ये निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांचे मतदानाचे अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतले होते. किती मोठा हा स्कॅम होता, असं शिंदे म्हणाले. त्यामुळं तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा? तुम्हाला काय अधिकार आहे मत चोरी म्हणण्याचा? असा सवाल शिंदेंनी केला.
252 व्हिडिओ 1497 नग्न फोटो; खडसेंच्या जावयाचं ‘डर्टी हिडन फोल्डर’ चाकणकरांकडून उघड
ते म्हणाले, जेव्हा ते हरतात तेव्हा ते निवडणूक आयोग, ईव्हीएम या सगळ्यावर आरोप करतात. राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे. राहुल गांधी यांना निवडणुकीचं, मतांचं आणि विरोधी पक्षनेतेपदाचं भान असायला पाहिजे, अशी टीका शिंदेंनी केली. तसंच ते केवळ निवडणूक आयोगाचा अपमान करत नाहीयेत. तर हा कोट्यावधी लाडक्या बहिणी, कोट्यावधी शेतकऱ्यांचा अपमान आहे. हा महाराष्ट्रातील तमान जनतेचा अपमान आहे, असंही शिंदे म्हणाले.
पुढं शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात १ लाख १८६ बूथ आहेत. जर एका बूथवर ७० जास्त मते पडली तर ७० लाख जास्त मते पडतात. लाडकी बहीण योजना केल्यानंतर सर्वांनी महायुतीला विजयी करण्याचा निर्णय घेतला. यामुळेच मतदानाचा टक्का वाढला आणि हे ते स्वीकारण्यास तयार नाहीत. राहुल गांधी फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम करत आहेत, असंही शिंदे म्हणाले.