252 व्हिडिओ 1497 नग्न फोटो; खडसेंच्या जावयाचं ‘डर्टी हिडन फोल्डर’ चाकणकरांकडून उघड

252 व्हिडिओ 1497 नग्न फोटो; खडसेंच्या जावयाचं ‘डर्टी हिडन फोल्डर’ चाकणकरांकडून उघड

Rupali Chakankar Reveal hidden folder of Pranjal Khevalkar Drugs Party : माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवळकर रेव्ह पार्टी प्रकरणात चांगलेच अडकणार असं चित्र आहे. त्यांच्यासह साथीदारांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून एका बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं पुण्यातील रेव्ह पार्टीसंदर्भाने तक्रार केली असून त्याच्या तपासाचा अहवाल मागवला आहे. त्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत खेवलकरच्या ड्रग्ज पार्टीतील हिडन फोल्डरबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

काय म्हणाल्या रूपाली चाकणकर ?

यावेळी बोलताना चाकणकर म्हणाल्या की, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न आणि अर्धनग्न फोटो, व्हिडिओ आढळले आहेत. त्यांच्याकडून महिलांना चित्रपटात काम देतो म्हणून बोलवून घेण्यात आलं. लोणावळा, साकीनाका येथे पार्ट्या झाल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे. महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग केलं आहे.

मुंबईकरांसाठी खुशखबर! यंदा नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठा गौरी विसर्जनास सुट्टी जाहीर

यामध्ये 1 हजार 749 अधिक नग्न फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. 234 फोटो 29 व्हिडिओ अश्लील आहेत, नशा देऊन लैंगिक अत्याचार केलेले आहेत. हे फोटो, व्हिडिओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले आहेत. मोलकरणीचे देखील फोटो आणि व्हिडिओ आहेत. अरुष नावाचा व्यक्ती मुली पुरवत होता. त्यांना सिनेमात काम करण्याच अमिश दिल जायचं. मुलीचं शोषण करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करावे : तुषार कुटे

त्यामुळे आता मानवी तस्करी विरोधी पथक या प्रकरणात काम करत आहेत. महिलांची तस्करी करण्यात आलेली आहे. आरोपीने 28 वेळा रूम बुक केल्या आहेत.मोबाईल, आर्थिक व्यवहार, मेलचा तपास करण्यात यावा. दोषींवर कठोरपणे कारवाई करण्यात यावी. महिलांचं अनैतिक शोषण आहे. SIT च्या माध्यमातून योग्य तपास व्हावा. ज्यांचं लैंगिक शोषण झालं आहे. त्या मुलींनी समोर येऊन तक्रार द्यावी. त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल. सर्व व्हिडिओ, फोटो हे प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधील आहेत.

ब्रेकिंग! खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट; खास पैठणीचं गिफ्ट, राजकारण तापलं…

हे फार मोठं रॅकेट आहे, हे उघडकीस येईल. अनेक व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुलींचा वापर केला गेला आहे. पीडित मुलींनी समोर येऊन तक्रार द्यावी, काही मुलींनी तक्रार दिली आहे. अनेक वर्षांपासून सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात आहेत. लोणावळा, जळगाव, साकीनाका येथे हे सगळं प्रकरण सुरू होत. असं म्हणत चाकणकर यांनी खेवलकर प्रकरणी सणसणी माहिती दिली आहे. तसेच यावेळी रोहिणी खडसेंवर बोलताना त्या म्हणाल्या की, सहानुभूती वाटत आहेत. हे सर्व माहीत झाल्यानंतर त्यांचे अनेक गैरसमज दूर होतील. त्यांना आणखी काही सांगायचं असल्यास कोर्टात सांगावं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube