‘शरद पवारांनी शिवसेनेत चार वेळा फूट पाडली’; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा गंभीर आरोप

‘शरद पवारांनी शिवसेनेत चार वेळा फूट पाडली’; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा गंभीर आरोप

Deepak Kesarkar Criticized Sharad Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कुणी कुणाचा पक्ष फोडला, फोडाफोडी करण्यासाठी काय प्रयत्न केले याचे किस्से नेते मंडळींच्या तोंडी आहेत. यातच आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेचे नुकसान करण्याची कोणतीच संधी पवारांनी सोडली नाही, अशी टीका केसरकर यांनी केली.

केसरकर पुढे म्हणाले, शरद पवार यांनी नेहमीच बाळासाहेबांवर टीका केली. त्यांनी कायमच शिवसेनेचा द्वेष केला. सन 2017 मध्ये जेव्ह राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाली होती तेव्हा सेना सत्तेत येत असेल तर आम्ही भाजपबरोबर जाणार नाही, असे पवारांनी सांगितले होते असे केसरकर म्हणाले.

Deepak Kesarkar : शरद पवारांकडून शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न, शिंदे गटाचा गंभीर आरोप

यानंतर केसरकर यांनी 1989 मधील एक किस्सा सांगितला. यावेळी दिना पाटील यांच्या मुलुंड येथील प्रचारसभेत शरद पवार यांनी बाळासाहेबांर व्यक्तिगत टीका केली होती. त्यानंतर येथेच बाळासाहेबांनी सभा घेत पवारांना रोखठोक प्रत्युत्तर दिले होते. पुढे मनोहर जोशींच्या मध्यस्थीने दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात बोलायचे नाही असे ठरले होते. बाळासाहेबांनी हा शब्द अखेरपर्यंत पाळला. पवारांनी शब्द मोडत शिवसेनेत चार वेळा फूट पाडली असा आरोप केसरकर यांनी केला.

शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच शिवसेनेत फूट पाडली, हे जगजाहीर आहे. 2014 नंतर ही अनेक घडामोडीत पवार यांनी शिवसेनेसारखी लढाऊ संघटना कशी संपेल, या दृष्टीनेच प्रयत्न केले. यावेळी केसरकर यांनी गेल्या 10 वर्षातील अनेक राजकीय घडामोडी वेळी पडद्यामागे घडलेल्या घटनांचा संदर्भ देत पवार यांचा शिवसेनेबद्दलचा आकस, द्वेष दाखवून दिला.

‘निवडणुकीनंतर शरद पवारांना भिंग लावून शोधावं लागेल’; भाजपचा हल्लाबोल

2017 मध्ये जेव्हा भाजप आणि  राष्ट्रवादी एकत्र येण्याची तयारी करत होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेबरोबर असलेली युती कायम राहिली पाहिजे अशी भूमिका घेतली होती तेव्हा शरद पवार यांनी शिवसेना बरोबर असेल तर आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही असं भाजपा नेतृत्वाला कळवले होते, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते या घडामोडींचे साक्षीदार आहेत, असे  केसरकर यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube