खबरदार! शुल्क आकारणी कराल तर कठोर कारवाई; चंद्रकांत पाटलांचा इशारा कुणाला?

खबरदार! शुल्क आकारणी कराल तर कठोर कारवाई; चंद्रकांत पाटलांचा इशारा कुणाला?

Chandrakant Patil : राज्यातील सरकारी महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्थांत आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थीनींना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क शंभर टक्के माफ आहे. तरी देखील सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करुन शुल्क आकारणी केल्यास अशा शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला. राज्य सरकारच्या या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मंत्री पाटील यांनी हा इशारा दिला.

यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, अशोक मांडे आदींसह एसएनडीटी विद्यापीठांचे अधिकारी उपस्थित होते.

तेव्हा पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने ड्रग्जच्या घटना सुरु होत्या, अजित पवार गटाकडून खळबळजनक आरोप

मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस, शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यापैकी, ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलींना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क घेण्यात येऊ नयेत.

जर विद्यापीठ, महाविद्यालय यांनी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क घेतले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

भांडण तुम्ही लावली व ठाकरे गट तुम्ही फोडला; भुजबळांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube