झेडपी, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाकडून आज घोषणेची शक्यता…

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून आज केली जाणार असल्याची शक्यता आहे.

Election

Election Commission : महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच आता राज्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची (Election Commission ) आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद, पंचायती समितीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याची सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सिस्पे घोटाळ्याची नुसती चौकशीची घोषणा झाली तर एवढे गडबडता का? विखेंचा लंकेंवर निशाणा

येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोग आज घोषणा करणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महापालिका निवडणुका पार पडताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. न्यायालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे आज निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनुसार, या निवडणुकांसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होऊ शकते.

पुण्यात प्रचाराच्या धामधूमीत खळबळ; भाजप उमेदवार गणेश बिडकरांवर हल्ल्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल…

दरम्यान, राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र, यामधील 17 जिल्हा परिषदा आणि 88 पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने, या संस्थांमध्ये सध्या निवडणुका घेता येणार नाहीत. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेत बसणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी अंतिम टप्प्यात आहे.

follow us