“आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा पण काही..”, असीम सरोदेंनी नेमकं काय सांगितलं?
Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे (Maharashtra Elections) वाहत आहेत. राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवाारांची नावे आणि मतदारसंघ ठरविण्यासाठी चर्चा सुरू आहेत. या घडामोडी घडत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. अॅड. असीम सरोदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा महाविकास आघाडीला काही अटी शर्तींसह पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. आज असीम सरोदे (Asim Sarode) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली.
निर्भय बनो, संविधान बचाव, लोकशाही वाचवा म्हणत मोहीम विधानसभा पार्श्वभूमीवर सुरू करत आहोत. यावेळी महाविकास आघाडीला काही अटी शर्तींसह आमचा पाठिंबा असणार आहे. सत्य सांगावे, धर्मांध वातावरण नसावे, पर्यावरण, आरोग्य, शेती यांसह विविध विषयाला धरून महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहोत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे लोकशाहीच्या जवळचे वाटत आहेत, असे अॅड. सरोदे यांनी सांगितले.
नगरमध्ये शुक्रवारी निर्भय बनो सभा; अॅड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरींची उपस्थिती
राज्यपालांनी सात आमदारांनी नियुक्ती दिली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत या आमदारांनी आज विधीमंडळात शपथ घेतली. यावर असीम सरोदे यांनी भाष्य केले. सरोदे म्हणाले, राज्यपाल यांना अधिकार आहे, पण आधीचे राज्यपाल कोश्यारी यांनी गैरफायदा घेतला. यावेळी राज्यपाल यांनी तातडीने शहानिशा करून मान्यता दिली.
सुचवलेली नावे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत का ? त्यांनी दोन पर्सनॅलिटी असलेल्या व्यक्ती आहेत, राजकीय आहे आणि सामाजिक संस्था काढून काम करत आहेत. आज या आमदारांचा झालेला शपथविधी हे राज्यपालांचा राजकारणासाठी फायदा करुन घेण्याचे उदाहरण आहे. राजकीय पक्षातील लोकांना प्राधान्य देण्यात आले अशी टीका सरोदे यांनी केली.
आनंददायी शिक्षण असावे, यासाठी 12% निधी शिक्षण आणि 12% निधी आरोग्यासाठी काढून ठेवावा. नंतर इतर निधीचे कामकाज करावे. दलित विद्यार्थ्यांसाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी आहे. यावेळी आम्ही जिल्हास्तरावर सभा घेणार आहोत. धोरण आणि स्ट्रॅटेजी म्हणून काम करणार आहोत. सत्तापिपासूनपणा महाराष्ट्राने कधीच पहिला नव्हता. शिंदे- फडणवीस सरकार लोकशाहीची पायमल्ली करत आहे. राज्यात माजी राज्यमंत्र्यांची हत्या होते हे खरंच दुर्दैवी आहे, असे विश्वंभर चौधरी म्हणाले.
शिंदे गटाला खिंडार पडणार, CM शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे परतणार; असीम सरोदेंचा मोठा दावा