शिंदे- फडणवीसांचा मोठा निर्णय; बोगस बियाणे विकणाऱ्यांना होणार 10 वर्षांची शिक्षा

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 06 10T171950.004

Abdul Sattar :  पेरणीच्या हंगामामध्ये अनेकदा बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा घटना समोर आलेल्या आहेत. अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणांच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना दहा वर्षांची शिक्षा होणार आहे व त्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये कायदा आणला जाणार अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. यावेळी ते अकोला येथील दैनिक लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते.

अजित पवार पुन्हा नाराज? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

यावेळी सत्तार म्हणाले की ज्यांच्याकडे बोगस बियाणे असतील, ज्यांच्याकडे बोगस औषधे असतील किंवा खते असतील त्यांनी ते तात्काळ नष्ट करावे. अन्यथा राज्यपाल यांच्याकडे मी पूर्ण रिपोर्ट देणार असून त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यावर त्या बोगस माल विकणाऱ्यांना किमान दहा वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा अधिवेशनात आणला जाणार असल्याचे सत्तारांनी सांगितले.

अजितदादांवर अन्याय झाला का? जयंत पाटलांनी एका वाक्यात स्पष्टपणे दिलं उत्तर

तसेच मी किती दिवस कृषी मंत्री राहील माहित नाही पण मंत्री असून देखील आपण काहीच केले नाही तर शेतकरी आपल्याला माफ करणार नसल्याचे सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून एक प्रस्ताव राज्यपालांकडे घेऊन जाणार आहे. त्यामध्ये पोलीस, महसूल आणि कृषी विभाग या तिघांचे दोन महिन्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले पाहिजे. त्यामुळे बोगसगिरी करणारे सर्व समोर येतील असे सत्तार म्हणाले

Tags

follow us