Rain Update : महाराष्ट्रात तुफान पाऊस; पुन्हा ऑरेंज-रेड अलर्ट जारी

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 22T111925.856

 Maharashtra Rain Alert : मुंबई आणि ठाण्यात काल (21 जुलै) रात्रीपासून तुफान पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. आजही (22 जुलै) या भागासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज हे बंद राहणार आहेत. जुलै महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक 1000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुणे हवामान विभागाने आज पुन्हा रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर, सातारा, ठाणे पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मुंबई, रत्नागिरी, जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. २३ जुलै रोजी पुणे आणि पालघर जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

तसेच नांदेडमध्ये गेल्या चोवीस तासांपासून सातत्याने पाऊस बरसत आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक जागी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली बुडाली आहेत. आधी लांबलेला पाऊस आणि आता सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलीय आहे.

Irshalwadi Landslide : 36 तासांची झुंज यशस्वी! मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेसाठी जवान ठरले ‘देवदूत’…

चंद्रपूर जिल्ह्यास हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. चंद्रपुरात जिल्ह्यातील सर्वच नद्याच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे आज सकाळी 5 वाजता उघडले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube