..त्यानंतर मोदी-शहा नितीश-नायडूंचे पक्ष फोडतील; राऊतांचा खळबळजनक दावा

..त्यानंतर मोदी-शहा नितीश-नायडूंचे पक्ष फोडतील; राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut on PM Modi : लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता केंद्रात भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकार अस्तित्वात आलं आहे. पहिल्या टप्प्यात नरेंद्र मोदी यांच्याबरोबर शपथ घेतलेल्या मंत्र्यांना विभागांचे वाटपही झालं आहे. आता लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. स्पीकर पद अतिशय महत्वाचं असल्याने टीडीपीने आधीच यावर दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे भाजप देईल त्या उमेदवाराला पाठिंबा देऊ असे जेडीयूने म्हटले आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा अध्यक्षाची निवड झाल्यावर मोदी आणि शहा ही जोडी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे पक्ष फोडतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मोदींना भाजपमधूनच प्रचंड विरोध, संघ त्यांना घरी.. संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि मोदी शहांवर घणाघाती टीका केली. राऊत म्हणाले, लोकसभा सदस्यांचा शपथविधी व्हायचा आहे तो होईल. लोकसभेचे अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितले आहे. चंद्राबाबू नायडू यांचं मी नाव ऐकत आहे ते जर त्यांना लोकसभेचे अध्यक्षपद राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तेलगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांचा पक्ष हे फोडल्याशिवाय राहणार नाहीत. लोकसभेचे अध्यक्ष पद हे अत्यंत महत्त्वाचे असते. जसे महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भाजपाचे पॉलिटिकल एजंट होते. त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीने फुटल्याचे जाहीर करण्यात आलं होतं.

राहुल नार्वेकरांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने महाराष्ट्रात जसा निकाल दिला तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो. ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ही भाजपची परंपरा आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मोदींची नाही. हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, चिराग पासवान यांचे पक्ष फोडतील असा दावा राऊत यांनी केला.

शिंदेंची गुलामी करणाऱ्या सूर्यवंशी भ्रष्ट अधिकारी; वायकरांच्या बाजूने निकाल दिल्याने राऊत भडकले

..तर आम्ही चंद्राबाबूंच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ

चंद्राबाबू नायडू यांनी जर त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा केला तर अध्यक्ष पदासाठी तर आम्ही चर्चा करू आणि त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. या देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना झिडकारलं आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव केलाय. लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीने निवड होणे गरजेचे आहे. उपाध्यक्षपद हे आता कायद्याने आणि घटनेने विरोधी पक्षाला मिळायला हवे. आता नरेंद्र मोदींचा काहीच ताम झाम राहिला नाही. टेकू वर बसलेले सरकार हा टेकू कधीही कोसळू शकतो. राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो, असा इशारा राऊत यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube