Ajit Pawar : अर्थमंत्री अजितदादांचं शिक्षण किती? म्हणाले, मी तर दहावीत…
Ajit Pawar Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. आता ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळच्या राजकारणात अनेक दमदार निर्णय घेतले. त्यांनी ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांना दिलेल्या मुलाखतीत बालपण व शिक्षणासंदर्भात काही खास किस्से सांगिततले. या मुलाखतीत अजित पवार म्हणतात, आम्हा भावंडांचे शिक्षण बारामती येथील बालविकास मंदिरात झाले. तर हायस्कूलचे शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत झाले. प्राथमिक शिक्षण बारामतीत झाले. त्यानंतर दहावीला मुंबईत आलो. येथील विल्सन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. पण, दुर्दैवाने दहावाती नापास झालो.
Ajit Pawar : माझा राजकारणातला वारसदार कोण? अजितदादांनी उत्तर सांगूनच टाकलं
या परीक्षेत माझा एक विषय राहिला होता. तो पुढील वर्षाच्या परीक्षेत दिला. पण, माझे मन लागत नव्हते. कारण माझ्याबरोबरची जी बॅच होती ती पुढे निघून गेली होती. त्यानंतर मी कोल्हापुरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला. आम्ही अभ्यासात फार हुशार नव्हतो. नीता, श्रीनिवास पण तसेच सुप्रिया त्यातल्या त्यात बरी.. सुप्रिया, नीता आणि श्रीनिवास यांचा शिक्षणात कधी गॅप पडला नाही. पण, मी गॅप घेतला, असा किस्सा अजितदादांनी सांगितला.
मी बी.कॉमचं शिक्षण घेतलं. पण, बी.कॉम काही झालो नाही. माझी एक सेमिस्टर राहिली होती. एक सेमिस्टर राहिल्यानंतर बी.कॉम लिहीता येत नाही. मग आपल्याला बारावीचं शिक्षण लिहावं लागतं. त्यामुळे माझा फॉर्म भरताना मी बी. कॉम किंवा पदवीधर कधीच लिहीत नाही, असे अजित पवार म्हणाले.
.. तर मी उद्योगपती नक्कीच झालो असतो
तुम्ही राजकारणात आला नसतात तर काय झाला असता असा प्रश्न विचारल्यानंतर अजितदादा म्हणाले, जर मी राजकारणात आलो नसतो तर शेती केली असती. शेती करतानाच एखादा चांगला व्यवसाय करून मोठा उद्योगपती नक्कीच झालो असतो.