‘अजितदादांनी माझं नाव घेतलं ही वस्तुस्थिती, हम करेसो चालत नसतं’; भाजप आमदाराचा रोख कुणाकडे?

‘अजितदादांनी माझं नाव घेतलं ही वस्तुस्थिती, हम करेसो चालत नसतं’; भाजप आमदाराचा रोख कुणाकडे?

Maharashtra Politics : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून आरपारच्या लढाईची भाषा बोलली जात आहे. सभा मेळाव्यांतूनही नव्या लढाईचे संकेत दिले जात आहे. खुद्द अजित पवार (Ajit Pawar) यांनीही दोन दिवसांपूर्वी सभेत हा निर्णय का घ्यावा लागला हे सांगितले होते. त्यांनी या सभेत जे काही सांगितले त्याला भाजप आमदार किसन कथोरे (Kasan Kathore) यांनीही दुजोरा दिला आहे.

कथोरे यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होण्याअगोदर शरद पवार यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला त्या पहिल्या दिवसाचा साक्षीदार मी स्वतः होतो. पवार साहेबांबरोबर आम्ही काम केलं. वसंतराव डावखरेही होते. यानंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली.

NCP Political Crisis : …म्हणून शरद पवारांचा धुळे-जळगाव जिल्हा दौरा झाला रद्द

त्यानंतर अजितदादांनी आपल्या भाषणात जे सांगितलं माझं नाव घेतलं ही वस्तुस्थिती आहे. ते नाकारून चालणार नाही. हम करे सो चालत नसतं, लोकांना प्रेमानं जोडणं महत्वाचं असतं, असे कथोरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, अजित पवार भाषणात म्हणाले होते की मोदी साहेबांचे हात आम्ही बळकट करू. देशाचे पंतप्रधान पुन्हा मोदी व्हावेत यासाठी त्यांनी राज्यात परिवर्तन घडवलं. खरं म्हणजे आघाडीत बिघाडी झाली ही आमच्या दृष्टीने सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत यासाठी चांगले निर्णय होत असल्याचे आमदार कथोरे म्हणाले.

आत्ता 44 प्लसचा आकडा, आगे आगे देखो.., आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube