शंभर कोटींचा निधी आला पण कुठे गेला पत्ताच नाही; आव्हाड सरकारला कोर्टात खेचणार
Jitendra Awhad : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच बंडात साथ देणारे आमदार आणि शिंदे गटातील आमदारांना बक्कळ निधी दिला. इतकेच नाही तर राष्ट्रवादीतील राजकीय नाट्यावेळी अजित पवार गटातील आमदारांवर कारवाईचा बडगा उगारणारे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातही भरघोस निधी दिला. अजितदादांच्या या निधी वाटपाची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
‘वडिलांचे आशिर्वाद, जनतेची साथ अन् तुमची ताकद’, ठाकरेंच्या घणाघाती मुलाखतीचा टीझर…
जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघासाठी निधी मंजूर झालेला नाही. या विरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. नगरविकासच्या चर्चेवर भाष्य करताना मी सांगितलं की विकासामध्ये राजकारण करायचं नसतं, असं यशवंतराव चव्हाण म्हणायचे. गेल्या वर्षभरात आम्ही बघत आहोत. माझ्या एकट्याच्या मतदारसंघात नगरविकास खात्यातर्फे 100 कोटी देण्यात आले. पण ते पैसे कुणाला दिले, कसे दिले, याच्याशी काहीच देणघेणं नाही. पण मला एक रुपयाही देण्यात आला नाही. माझं राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी सरकारी पैशांचा वापर केला जात असेल तर हे चुकीचं आहे अशी टीका आव्हाड यांनी केली.
निधी वाटप करताना कोणत्या मतदारसंघात किती निधी दिला गेला याची स्पष्टता असणे आवश्यक आहे. पण, जी कामं आधी झालेली आहेत ती कामं पुन्हा बिलात दिसतात, असेही आव्हाड म्हणाले.
Jayant Patil : अजितदादांनी दिला बक्कळ निधी; जयंत पाटील म्हणाले, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून…
अजितदादांच्या निधी वाटपाचं जयंत पाटलांनाही कौतुक
अजित पवार यांनी केलेल्या निधीवाटपावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली होती. ‘मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काही वर्षे काम केलं आहे. त्यामुळे मला याचं कौतुक आहे. पुरवणी मागण्या ४६ हजार कोटींपर्यंत गेल्या खरंच, एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकार मागण्या मान्य करू शकते. मागेल त्याला, पाहिजे त्याला निधी मिळतोय याचं कौतुक आहे. लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात निधी मिळाला तर थोडी खुशी राहणारच ना’, असं जयंत पाटील म्हणाले.