केसरकरांना ताब्यात घेऊन चौकशी करा; ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची मागणी

केसरकरांना ताब्यात घेऊन चौकशी करा; ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut on Deepak Kesarkar : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागील वर्षात शिवसेनेत केलेल्या बंडासंदर्भात केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर केसरकर यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आत्महत्येचे विचार येणारी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसली असेल आणि असे मानसिक स्वास्थ्य ठीक नसलेल्या व्यक्तीच्या हातात राज्य आहे हे त्यांचे मंत्री सांगत आहेत. ज्या व्यक्तीच्या हातात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आहेत त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असतील तर अशी मनस्वास्थ्य बिघडलेली व्यक्ती या राज्याचं नेतृत्व कशी काय करू शकते असा सवाल त्यांनी केला. मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांच्यावर आता जबाबदारी आहे. मुख्य म्हणजे हे गुपित इतके दिवस का लपवून ठेवले म्हणून दीपक केसरकर यांचीही चौकशी व्हायला पाहिजे. खरं म्हणजे त्याबद्दल पोलिसांनी केसरकरांना ताबडतोब ताब्या घेतलं पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार घोळतो आहे आणि ते केसरकरांना माहिती आहे, असे राऊत म्हणाले.

परभणी : भाजपचे ‘कमळ’ कोमेजणार? राष्ट्रवादीचा ‘गजर’ अन् काँग्रेस, ठाकरेंनाही मिळणार दिलासा

काय म्हणाले होते केसरकर ?

एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झालं नसतं तर त्यांनी सर्व आमदारांना परत पाठवून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती. शिंदे यांनी आमदारांसाठी जीवाचीही पर्वा केली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे केसरकर म्हणाले. अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केल. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. एकनाथ शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला. नंतर शिंदेंना वाटलं, ही सर्व लोक माझ्याबरोबर प्रेमाने आली आहेत. कारण, शिंदेंचा अपमान झाला तो दिवस वर्धापनदिनाचा होता.

एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत. शिंदेंनी म्हटलं, मला जेव्हा वाटलं उठाव यशस्वी होणार की नाही, तेव्हा एकच गोष्ट केली असती. माझ्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता, माझी चूक झाली आहे. यांची काही चूक नाही. तिथेच माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं शिंदेंनी सांगितल्याचं केसरकर म्हणाले.

संजय शिरसाटांचा दावा अन् जयंत पाटलांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube