संजय शिरसाटांचा दावा अन् जयंत पाटलांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…

संजय शिरसाटांचा दावा अन् जयंत पाटलांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. संजय शिरसाटांपेक्षा माझी विश्वासार्हता जरा जास्त असेल नाही का? असं खोचक प्रत्युत्तर देत पाटलांनी शिरसाटांचा दावा हाणून पाडला आहे.

सैन्यात भरती व्हायचंय! महाज्योती संस्थेकडून उमेदवारांना प्रशिक्षणासह विद्यावेतनही मिळणार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडमोडींना चांगलाच वेग आलाय. उद्धव ठाकरे यांना एकावर एक धक्के बसत असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलच भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अखेर या दाव्यावर जयंत पाटलांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

Ram Temple: रामलल्लाचे दर्शन कधी होणार?; प्राणप्रतिष्ठा ते दर्शनापर्यंतची संपूर्ण टाइमलाईन जाहीर

जयंत पाटील म्हणाले, संजय शिरसाटांपेक्षा माझी क्रेडिबिलिटी (विश्वासार्हता) जरा जास्त असेल नाही का? त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी प्रतिक्रिया घेणं म्हणजे जरा जास्तच झालं, पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर एकच हशा पिकला होता.

ShivSena Anniversary : ‘एक नोटीस आली, तेव्हा xxx पातळ झाली, त्यामुळे… ‘ मोदी-शाहंवर टीका अन् मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना ठणकावले

काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. भाजप नेत्यांकडूनही अनेक दावे केले जात होते. अजित पवारांनीही आपल्या दौऱ्यादरम्यान संशयास्पद भूमिका घेतल्याने राजकारणात मोठी घडमोड घडणार असल्याची चिन्हे दिसून येत होती. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट करीत मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Kolhapur मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, इमारतीवरुन उडी मारताना एकाचा मृत्यू

अजित पवारांनंतर आता जयंत पाटील भाजपात येणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. अजित पवारांनंतर आता जयंत पाटलांनीही रोखठोक भूमिका स्पष्ट करीत संजय शिरसाटांवर खोचक टीका केलीय.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीकडून 20 जून गद्दार दिवस तर शिंदे गटाकडून स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. यावर संजय राऊतांनी संयुक्त राष्ट्र संघाला हा दिवस ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी करणारं पत्रदेखील लिहिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube