दोन दिवसांत मुसळधार! काळजी घ्या, पुणे-मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

दोन दिवसांत मुसळधार! काळजी घ्या, पुणे-मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain Update : राज्यात मान्सूनचा परतीचा पाऊस चांगलाच (Maharashtra Rain) हजेरी लावू लागला आहे. मागील आठवड्यापासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) होत आहे. आणखीही काही दिवस अशाच जोरदार पावसाची शक्यता व्यक्त (Rain Alert) होत आहे. कालही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने मुंबईला यलो अलर्ट (Mumbai Rains) जारी करण्यात आला आहे. राज्यातील अन्य भागांतही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून ऑक्टोबर ते डिसेंबरमधील अंदाज जाहीर; आज राज्यात कुठं-कुठं पाऊस बरसणार?

हवामान विभागाने पुढील 24 तासांत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आजही काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरासह (Pune Rains) काही जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. आज आणि उद्या नाशिक, नगर, पु्णे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अतिरिक्त काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात आज दिवसभर मुसळधार! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ आणि राज्यातील अन्य भागांत येत्या एक ते दोन दिवसांत पावसाची शक्यता आहे. यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे. या काळात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube