विद्यार्थ्यांना गुडन्यूज! प्रतिज्ञापत्रासाठीचे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ; महसूलमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Government : राज्य सरकारच्या महसूल विभागाने विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी बसणारा आर्थिक भुर्दंड काही प्रमाणात कमी होणार आहे. विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक असते. प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर टाइप करावे लागते. या स्टॅम्पसाठी 500 रुपये मोजावे लागत होते. हेच शुल्क आता माफ करण्यात आले आहे. परंतु, या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. या योजनेसाठी सरकारला मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे अन्य योजनांसाठी निधीची तरतूद करताना अडचणी येत आहेत. यासाठी म्हणून दरवाढ करण्याचे प्रकार सुरू झाल्याचे दिसत आहे. 100 रुपयांना मिळणारा स्टॅम्प थेट 500 रुपयांवर गेला आहे.
परंतु, याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत होता. विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी प्रतिज्ञापत्राची आवश्यकता असते. प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपवर टाइप करून द्यावे लागते. याआधी स्टॅम्प पेपर 100 रुपयांना मिळत होता. टायपिंग आणि अन्य कामे मिळून सर्व खर्च 250 रुपयांपर्यंत होत होता. परंतु, आता स्टॅम्प पेपर 500 रुपयांना झाला आहे. बाकीचा खर्च मिळून विद्यार्थ्यांना 750 ते 800 रुपयांपर्यंत पैसे खर्च करावे लागत होते. काही वेळेस तर थेट हजार रुपयांपर्यंत खर्च जात होता. इतके पैसे खर्च करणे आवाक्याबाहेरचे होते.
आधी महसूल मंडळांची फेररचना, नंतर अप्पर तहसीलचा निर्णय; मंत्री विखेंनी सांगितला प्लॅन
विद्यार्थ्यांच्या पालकांतूनही नाराजी व्यक्त केली जात होती. या खर्चात कपात झाली पाहिजे अशी मागणी सातत्याने होत होती. शैक्षणिक कारणासाठी हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी होत होती. या मागणीची दखल सरकारने घेतली आहे. मुद्रांक शुल्कच माफ करण्यात आले आहे.