काळजी घ्या! राज्यात उष्णतेच्या लाटा येणार; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

काळजी घ्या! राज्यात उष्णतेच्या लाटा येणार; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Weather Today : राज्यात उन्हाच्या झळा आधिक तीव्र होताना दिसत आहेत. काही दिवसांपासून (Maharashtra Weather) अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता पाऊस थांबला असून कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. पुढील 48 तासांत राज्यातील काही भागांतील तापमानात 40 अंशांपेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मुंबईतील तापमान 35 अंश असले तरी हवामान उष्ण आणि दमट राहील असा अंदाज आहे.

राज्यात पुढील 48 तासांत काही भागांतील तापमान 40 अंशांच्या पुढे जाऊ शकते. त्यामुळे यावर लक्ष ठेऊन नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मध्य प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून थेट तामिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील कायम राहील असे स्पष्ट करण्यात आले.

सावधान, तर तुमचंही रेशनकार्ड होईल रद्द, राज्य सरकारकडून शोधमोहीम सुरू; आदेश धडकला

शनिवारी राज्यातील तापमान पाहिले तर मुंबई 35.9, अहिल्यानगर 37.9, नाशिक 39.1, सोलापूर 39.6, परभणी 37.8, जळगाव 40.5, ठाणे 38, छत्रपती संभाजीनगर 39.4, मालेगाव 40.6, अकोला 41.7, अमरावती 41.2, भंडारा 39.6, बुलढाणा 37.2, चंद्रपूर 41.8, गडचिरोली 39, गोंदिया 38.8, नागपूर 40.2 आणि वर्धा येथे 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या काळात देशातील बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान जास्त राहील. राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा येतील अशी स्थिती आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील तापमान जास्त राहणार आहे असा इशारा देण्यात आला आहे. मार्च महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेचा त्रास फारसा जाणवला नाही. परंतु, आता एप्रिल महिना  सुरू झाला असून तापमानात रोजच वाढ होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात उष्णतेची लाट; काही ठिकाणी पारा ४२ अंशापर्यंत, ‘या’ जिल्ह्यात पावसाचीही शक्यता

follow us
  • fb
  • instagram
  • youtube