‘मीठ-मिरची, धान्य, अन् कपडालत्ता घेऊन या’; जरांगेंच्या पायी दिंडीचं नियोजन कसं?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलन आता चौथ्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. आरक्षणाच्या मागणी मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईत धडक घेणार आहे. जालन्यातील अंतरवली ते मुंबई अशा पायी दिंडीचे आयोजन मनोज जरांगेंनी केलं आहे. येत्या 20 जानेवारीपासून जरांगेंच्या पायी दिंडीला सुरुवात होणार असून दिंडीत सामिल होणाऱ्या मराठा बांधवांनी सोबत मीठ-मिरची, साबण, मच्छर कॉईल, धान्य, रग, वाहनांवर भगवा झेंडा, औषधे घेऊन येण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकच जरांगेंनी सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.
Manoj Saunik :राज्याच्या मुख्य सचिवांना मुदतवाढ? पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार?
अंतरवली सराटीतून या पायी दिंडीला सुरुवात होणार असून मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने लेकराबाळांच्या भविष्यासाठी यावं, असं जाहीर सभेत मनोज जरांगे यांनी आवाहन केलं होतं. त्यानूसार राज्यातील विविध जिल्ह्यातून मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने पायी दिंडीत सामिल होणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठी आंदोलकांना सोबत कोण-कोणत्या गोष्टी आणाव्यात, याची यादीच मनोज जरांगे यांनी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये चटई, उशी, स्वेटर, कपडे, सोबण, खोबरे तेलाची बाटली, जेवणासाठी भांडे, धान्य, कांदा, साखर, पत्ती यांसारख्या जीवनावश्यक वस्तू सोबत घेऊनच, घराबाहेर पडा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केलं आहे.
तावडेंचं प्लॅनिंग, फडणवीसांच्या फेवरेट अधिकाऱ्याचा राजीनामा; पाटील-चिखलीकरांना टेन्शन!
पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या बांधवांनी आपल्या वाहनाला भगवा झेंडा लावावा. यादीत सांगितलेल्या जीवनावश्यक वस्तू मोठ्या गोणीमध्ये भरुन वाहनांमध्ये घेऊन यावे. सोबत आणलेल्या वाहनामध्येच बांधवांनी आपली झोपण्याची व्यवस्था करावी. ज्या बांधवांकडे ट्रॅक्टर, ट्रॉली, पाण्याचे टॅंकर असतील तर त्यांनी सोबत घेऊन यावेत, जेणेकरुन ट्रॅक्टर, ट्रॉलीचा आधार घेऊन ताडपत्री बांधून त्याखाली बांधवांची झोपण्याची व्यवस्था होईल, अशा पद्धतीची ताडपत्रीही सोबत आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मनोज जरांगे यांच्या पायी दिंडीला अंतरवली सराटीतून सुरुवात होणार असून ही पायी दिंडी अंतरवली मार्गे शहागड-गेवराई-गढी-रांजणी-पाडळशिंगी-मादळमोही-काळेगाव-तांदळा-मातोरी-मिडसावंगी-खरवंडी-पाथर्डी-निवडूंगे-तिसगाव-करंजी-अहमदनगर-केडगाव-सुपा-शिरुर-शिक्रापूर-रांजणगाव-वाघोली-चंदननगर-लोणावळा-वाशी-आझाद मैदान-शिवाजी पार्क दादरमधून मुंबईत धडकणार आहे.
दादांनी निधी रोखला! भाजप अन् शिंदेंना सहनच करावं लागणार; जयंत पाटलांची बोचरी टीका
मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने राज्य सरकारकडे अहवाल सुपूर्द केला आहे. शिंदे समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे हा अहवाल सोपविला आहे. शिंदे समितीच्या अहवालानूसार ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येणार आहे. मात्र, या नोंदीच्या आधारे सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. त्यामुळे आता या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.