शरद पवार अन् उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी; चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट घणाघात
Bawankule comments on Pawar and Thackeray : मराठा आरक्षणावरून भापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी, पवार आणि ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे (Maratha reservation) मारेकरी असून ते आता कोणत्या तोंडाने बोंबा मारीत आहेत असा थेट प्रहार केला आहे. (OBC reservation) ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. (Sharad Pawar) त्याचबरोबर यांनी महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करून सामाजिक वातावरण बिघडवत ठेवण्याचा उद्योग केला असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
ठाकरेंच्याच काळात आरक्षण गेले पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही; जम्मूकाश्मीरमध्ये लवकरच होणार विधानसभा निवडणूक
मराठा आणि ओबीसी आरक्षणाशी केंद्र सरकारचा कुठलाही संबंध नाही. एक गोष्ट लक्षात घ्या शरद पवार अनेक वर्षे सत्तेत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते. मात्र, त्यांची भूमिका मराठा आरक्षण विरोधात आहे असा थेट आरोप बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री असताना पवारांनी मराठा समाजाला सवलती दिल्या नाहीत मात्र ते आता याविषयी बोलत आहेत हे आश्चर्य आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खटला कोर्टात योग्य पद्धतीने लढवला नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. ठाकरेंच्याच काळात आरक्षण गेले असा ठपकाही त्यांनी ठाकरेंवर ठेवला.
विकासाच्या मुद्द्यावर
त्याचबरोबर तुम्ही आरक्षण का दिले नाही आणि, मिळालेले आरक्षण कोर्टात का गमावले? असा प्रतिप्रश्नही पवार व ठाकरे यांना मराठा समाजातील नेत्यांनी करावा, असंही ते म्हणाले. तसंच, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला लोक कंटाळले असून त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय कामं केली हे जनतेला सांगावं. सकाळचा राजकीय भोंगा न वाजवता शेतकरी, शेतमजुरांना न्याय मिळवून द्यावा. विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवावी असंही म्हणाले.
घरासमोर रांगा लावतील सरकारची ७५ हजार जागांच्या महाभरतीची घोषणा हवेत विरली! परीक्षा रखडलेल्याच, विद्यार्थी अस्वस्थ
महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रिपदासाठी सुप्रिया सुळे व रोहित पवार, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे तयार झाले आहेत. मविआने खोटी आश्वासने देऊन मतं घेतली. मविआचे खासदार निवडून आले त्या ठिकाणी मतदारांना साडेआठ हजार रुपये द्यावेत, अन्यथा लोक त्यांच्या घरासमोर रांगा लावतील अशी खोचक टीकाही बावनकुळे यांनी यावेळी केली.