Maratha Reservation : कुणबींसुद्धा मोठा भाऊ म्हणून… अमोल मिटकरींच्या वक्तव्याने वादची शक्यता

Maratha Reservation : कुणबींसुद्धा मोठा भाऊ म्हणून… अमोल मिटकरींच्या वक्तव्याने वादची शक्यता

Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणं मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटी गावात उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

नुकतंच माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी सांगितलं की, त्यांना भेटण्यासाठी अकोला जिल्ह्यात आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजातील काही आंदोलन आले होते. त्यावेळी त्यांनी भूमिका मांडली की, मराठा समाजाला सरसकट जात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. आंदोलनात बहुसंख्य कुणबी बांधव होते की, मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावा. त्यामुळे हा तिढा सुटू शकतो.

ED समन्सला केराची टोपली, चौकशीला दांडी : केजरीवाल यांना अटक होणार? कायदा काय सांगतो?

ही माहिती दिल्यानंतर मिटकरी म्हणाले ज्याप्रमाणे मराठा समाजाचे भावना सगळेच समजून घेत आहेत. त्याप्रमाणे कुणबी समाजाने देखील मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाबद्दल भूमिका जाहीर करावी. ओबीसी मधल्या कुणबी समाजाने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी कोणती हरकत घेऊ नये. यावेळी मिटकरी यांनी असं देखील सांगितलं की, त्यांच्या या मागणीनंतर कुणबी समाजात प्रतिनिधींनी त्यांच्या या मागणीला होकार देखील दर्शवला. दरम्यान मिटकरी यांनी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन बोलवावं अशी मागणी देखील सरकारकडे करण्याचा आश्वासन या मराठा आंदोलकांना दिला आहे.

Maratha Reservation : मराठा आणि कुणबी वेगवेगळे की एक? इतिहास संशोधक सावंत काय म्हणाले…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube