सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर तोडगा, शिष्टमंडळ जरांगेंना नवा ड्राफ्ट देणार; बच्चू कडूंचे वक्तव्य
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाकडून या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानातच आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. नवीन ड्राफ्ट तयार केला असून हा ड्राफ्ट जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे. सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरही तोडगा काढण्यात आला आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Manoj Jarange: मुंबईकडे कूच करण्याचा, मनोज जरांगेंनी सांगितला अॅक्शन प्लॅन
राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी 30 ते 35 हजार नोंदी या मराठवाड्यातील आहेत. सगेसोयरे यांना कसे आरक्षण देता येईल यासंदर्भात एक मसूदा तयार करण्यात आला आहे. याबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहेत. मसुदा मनोज जरांगे यांना दाखवण्यात येणार आहे, असे बच्चू कडू म्हणाले. काल मुख्यमंत्र्यांबरोबर चार तास बैठक झाली. यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भातील ड्राफ्ट घेऊन आम्ही विभागीय आयुक्तांकडे जाणार आहोत. त्यानंतर हा ड्राफ्ट मनोज जरांगेंना देण्यात येईल. जरांगे पाटलांच्या सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता समाजाचे भले होत असेल तर त्यांनी आता आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन कडू यांनी यावेळी केले.
मसुदा जरांगे पाटलांना दाखवल्यानंतर त्यांचं मत काय आहे हे सुद्धा जाणून घेण्यात येणार आहे. प्रशासन जास्तीत जास्त दाखले देणार आहे. मी देखील त्याचा आढावा घेणार आहे. एका एका जिल्ह्यात 30-30 लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. 33,34 चे नमुने पुरावा म्हणून पाहण्यासाठी नियम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात जास्तीत जास्त दाखले देण्याचा प्रयत्न राहणार आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.
Maratha reservation : अजित पवारांनीच भुजबळांना मराठ्यांवर सोडलं; मनोज जरांगेंचा आरोप
नोंदींनुसार कुणबींचा आकडा वाढत चालला आहे. 33-34 च्या नमुन्यांवरूनही नोंदी शोधल्या जात आहेत. ही कागदपत्रे काळजीपूर्वक हाताळली जात आहेत. पुरावा म्हणून 33-34 चा नमुना पाहण्यासाठी अधिसूचना काढण्यात येणार आहे. 33-34 चा नमुना, गावपातळीवर उपलब्ध असलेली माहिती, लसीकरणाची माहिती यांसह अनेक पुरावे सहपुरावे म्हणून वापरले जावे यासाठी सूचना निघणार आहे, असेही कडू यांनी स्पष्ट केले.